शहादा बसस्थानकातून नवीन बसेस सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:20 IST2021-06-19T04:20:55+5:302021-06-19T04:20:55+5:30

शहादा आगारात गेल्या दोन महिन्यापासून थांबलेली लालपरी आता रस्त्यावर धावू लागल्या आहेत. टप्प्याटप्प्याने लांब पल्ल्याच्या बसेस सुरु झालेल्या ...

New buses started from Shahada bus stand | शहादा बसस्थानकातून नवीन बसेस सुरू

शहादा बसस्थानकातून नवीन बसेस सुरू

शहादा आगारात गेल्या दोन महिन्यापासून थांबलेली लालपरी आता रस्त्यावर धावू लागल्या आहेत. टप्प्याटप्प्याने लांब पल्ल्याच्या बसेस सुरु झालेल्या आहेत. गेल्या आठवडाभरापासून प्रवाशांचा मिळत असलेला प्रतिसाद यामुळे शहादा आगाराने आता लांब पल्ल्याच्या बसेस सुरू केल्या आहेत. यात शहादा-पुणे रात्री आठ वाजता, शहादा-पाचोरा (मुक्कामी) व्हाया शिरपूर, अमळनेर-पारोळा सकाळी साडेअकरा वाजता, ही बस दुसऱ्या दिवशी पाचोरा येथून सकाळी साडेसहा वाजता सुटते. शहादा-रावेर (मुक्कामी) दुपारी १२ वाजता, शहादा-शिरपूर व्हाया शहाणा, मालकातर, बोराडी सकाळी सात व दुपारी १२ वाजता, जयनगर मुक्कामी बस सायंकाळी साडेसात वाजता, राणीपूर मुक्कामी बस रात्री आठ वाजता, शहाणा मुक्कामी बस सायंकाळी साडेसात तर कढेल मुक्कामी बस सायंकाळी साडेसात वाजता सोडण्यात येत आहे. आता गुजरातमधील सुरत, उधना, अहमदाबाद, बडोदा, अंकलेश्वर तसेच मध्य प्रदेश राज्यातील पानसेमल, इंदूर, खरगोन, बऱ्हाणपूर या बसेस सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Web Title: New buses started from Shahada bus stand