नवापुरात जि.प. शाळा इमारतीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:30 IST2021-04-16T04:30:38+5:302021-04-16T04:30:38+5:30

स्थानिक युवकांनी आग लागल्याचे निदर्शनास येताच शाळेच्या मागील गेटचे कुलूप तोडून तात्काळ आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. ही आग विझविण्यासाठी ...

In Navapur, Z.P. School building on fire | नवापुरात जि.प. शाळा इमारतीला आग

नवापुरात जि.प. शाळा इमारतीला आग

स्थानिक युवकांनी आग लागल्याचे निदर्शनास येताच शाळेच्या मागील गेटचे कुलूप तोडून तात्काळ आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. ही आग विझविण्यासाठी वासीम मणियार, बबलू घडियाली, इस्रायल पठवा, अब्दुल बदुळा, राकेश प्रजापत आदी युवकांनी प्रयत्न केले. अन्यथा मोठ्या प्रमाणात आग लागली असती. त्यामुळे परिसरातील रहिवाशांच्या घरांनादेखील मोठा धोका पोहोचला असता. त्यानंतर नवापूर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामन दलाचे संतोष सोनार, भास्कर भालेराव, सलीम पठाण यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन आगीवर अर्ध्या तासात नियंत्रण मिळवले. शाळेच्या मागील बाजूला मोठ्या प्रमाणात पालापाचोळा साचल्याने मागील बाजूने विडी पिणाऱ्यांमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला. नगरसेवक आरीफ बलेसरिया यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

ब्रिटिश कालीनपूर्व जुनी इमारत धोकादायक असल्याने शिक्षण विभागाने २०१९ मध्ये जिल्हा परिषद मराठी, उर्दू, गुजराती शाळा जुन्या सरकारी रुग्णालयात स्थलांतरित केली आहे. आगीत जुने साहित्य व कागदपत्र जळून खाक झाले. वरच्या मजल्यापर्यंत आग पोहोचली होती. वेळीच आग नियंत्रणात आल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर जिल्हा परिषद मराठी, गुजराती व उर्दू तिन्ही माध्यमाचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: In Navapur, Z.P. School building on fire