नंदुरबार- सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांचे द्विशतक पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:28 IST2021-03-15T04:28:44+5:302021-03-15T04:28:44+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या २०० पार झाली आहे. रविवारी २०१ रुग्ण आढळून आले. सर्वाधिक ...

Nandurbar: For the second day in a row, corona patients crossed the double century | नंदुरबार- सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांचे द्विशतक पार

नंदुरबार- सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांचे द्विशतक पार

नंदुरबार : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या २०० पार झाली आहे. रविवारी २०१ रुग्ण आढळून आले. सर्वाधिक रुग्ण हे नंदुरबार तालुक्यातील १२८ आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. शनिवार, १३ मार्च रोजी आतापर्यंत सर्वाधिक अर्थात २१४ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रविवार, १४ रोजी देखील २०१ रुग्ण आढळून आले. रुग्णांमध्ये नंदुरबार तालुक्यात १२८ जणांचा समावेश आहे. त्या खालोखाल शहादा तालुक्यात ३८, तळोदा तालुक्यात २८, नवापूर तालुक्यात दोन, अक्कलकुवा तालुक्यात दोन तर जिल्हाबाहेरील तीन रुग्णांचा समावेश आहे. सुदैवाने आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

दरम्यान, जिल्ह्यातील सहाही तालुका मुख्यालयाच्या शहरात रात्रीच्या संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जात आहे. शिवाय विना मास्क फिरणाऱ्या २८ जणांवर दिवसभरात कारवाई करण्यात आली.

Web Title: Nandurbar: For the second day in a row, corona patients crossed the double century