शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
4
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
5
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
6
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
7
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
8
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
9
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
10
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
11
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
12
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
13
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
14
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
15
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
16
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
17
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
18
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
19
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
20
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

चिखलामुळे वाहनधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 13:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा-कुंडी ते होराफळी या घाट सेक्शनच्या रस्त्यावर चिखल झाल्याने वाहनधारकांना त्रासदायक होऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील मोरंबा-कुंडी ते होराफळी या घाट सेक्शनच्या रस्त्यावर चिखल झाल्याने वाहनधारकांना त्रासदायक होऊन वाहने चिखलात फसत असल्याने हाल होत आहेत. या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याने वाहनधारकांना अखेर चिखलात दगड-गोटे गोळा करून चिखलातील खड्ड्यात टाकून वाहने निघतील अशी तात्पुरती डागडूजी करण्याची वेळ आली आहे.
चार-पाच दिवसापूर्वी याच रस्त्यावर दरीजवळील वळणावर भाग खचून धोकेदायक झाला होता. त्याठिकाणीही वाहनधारकांनीच खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी दगड ठेवून वाहनधारकांना खचलेल्या रस्त्यापासून सावधान केले होते. अक्कलकुवा तालुक्यातील व सातपुड्याच्या अतिदुर्गम घाट सेक्शनच्या मोरंबा- कुंडी ते होराफळी या घाट सेक्शनच्या रस्त्याची पावसाळ्यापूर्वीच दुरवस्था झाली होती. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. होराफळी गावाजवळील रस्त्याची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. याठिकाणी रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे असल्याने त्यात पावसाचे पाणी साचून चिखलमय होऊन वाहनधारकांना वाहन काढताना गैरसोयीचे व त्रासदायक होत आहे. वाहने चिखलात फसून जात असल्याने साधी मोटारसायकल काढायला दोन-तीन लोकांनी ढकलून उचलून काढावी लागत आहे.
दररोजची होणारी गैरसोय व फजिती बघता संबंधित बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे वाहनधारकांवरच चिखलमय खड्ड्यात दगड-गोटे टाकून तात्पुरती दुरूस्ती करण्याची वेळ आली आहे. या रस्त्याची पावसाळ्यापूर्वीच दुरवस्था झाली होती व पावसामुळे अधिक भर पडत रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून रस्त्यावर सर्वत्र गुडघाभर चिखल झाला आहे. चार-पाच दिवसापूर्वी वळणावर दरीचा काही भाग खचून रस्ता धोकेदायक झाला होता. त्यामुळे वाहनधारकांना खचलेचा भाग रात्रीच्यावेळी लक्षात यावा यासाठी वाहनधारकांनी जागोजागी दगड ठेवून धोका दर्शविला होता. या कुंडी-होराफळी दरम्यान घाट सेक्शनच्या रस्त्यावर खड्ड्यातील चिखलामुळे होराफळी, खडकापाणी, तिनखुन्या, मोरखी, वालंबा, माल्याआंबा, तोबीकुवा, टोकणापिप्री, गुजरात बॉर्डरच्या परिसरातील वाहनधारकांना गैरसोयीचे व त्रासदायक झाले असून संबधित विभागाने घाट सेक्शनच्या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.