शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
अंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
4
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
5
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
6
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
7
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
8
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
9
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
10
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
11
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
12
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
13
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
14
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
15
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
16
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
17
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
19
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
20
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्याची भिंत न बांधल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गोमाई नदीवरील कवळीथ बंधाºयाची गेल्या पावसाळ्यात भिंत पडल्याने पाटचारींना पाणी सोडले गेले नाही. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गोमाई नदीवरील कवळीथ बंधाºयाची गेल्या पावसाळ्यात भिंत पडल्याने पाटचारींना पाणी सोडले गेले नाही. त्यामुळे या बंधाºयातून निघालेल्या पाटचाऱ्यांना यंदा पाणीच आले नाही. परिणामी टेंभली, आसूस, लोणखेडा, डोंगरगाव, शिरूड येथील शेतकºयांना अडचणींचा सामाना करावा लागत आहे. ही भिंत पावसाळ्यापुर्वी बांधावी अशी मागणी करण्यात येत आहे.गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे गोमाई नदीला वेळोवेळी पूर आला होता. या पुरामुळे कवळीथ येथील ब्रिटीशकालीन बंधाºयाची पाटचारींची भिंत पडली होती. परिणामी या बंधाºयातून निघणाºया पाटचाºयांचे पाणी बंद झाले आहे. गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधीक पाऊस होऊनही यंदा पाटचाºयांना पाणीच आले नसल्यामुळे टेंभली, आसूस, लोणखेडा, डोंगरगाव, शिरूड गाव व परिसरातील शेतकºयांना रब्बी व आता उन्हाळी हंगामासाठी पाणी मिळू शकले नाही.दरवर्षी कवळीथ बंधाºयातून लहान व मोठ्या पाटचारीला वेळोवेळी पाणी सोडले जाते. त्यामुळे या पाटचारीच्या लगत असलेल्या शेतकºयांना रब्बी व उन्हाळी हंगामासाठी मोठा दिलासा मिळत असतो. यंदा मात्र पाटचाºयांना पाणीच आले नाही. परिणामी उत्पन्नावर परिणाम झाला.पाटबंधारे विभागाने याची तातडीने दखल घेवून पडलेली भिंत तातडीने बांधणे आवश्यक आहे. येत्या चार महिन्यात पावसाळा सुरू होणार आहे. त्याआधी भिंत बांधली गेल्यास यंदा पाणी अडवून पाटचाºयांना पाणी सोडता येणार आहे. परंतु पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी निवेदने देवूनही दखल घेतली जात नसल्याची तक्रार शेतकºयांनी केली आहे.दरम्यान, भिंत बांधण्याबाबत त्वरीत कार्यवाही झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.कवळीथ बंधाºयातून निघणाºया पाटचारीमुळे सहा गावातील शेतकºयांना त्याचा लाभ होतो. यंदा मात्र पाटचारी कोरडीच राहिली. बंधारा व पाटचारीची भिंत तातडीने बांधावी व त्यातून पाणी सोडले जाईल याबाबत नियोजन करून शेतकºयांना दिलासा द्यावा.-जयप्रकाश पाटील,संचालक,सातपुडा साखर कारखाना.