शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरातील शोली पोल्ट्रीचे सर्वाधिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:43 IST

गुरुवारी शहरातील शोली पोल्ट्रीचे पक्षी भोपाळ येथे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. बर्ड फ्लू अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पशुसंवर्धन विभागामार्फत ...

गुरुवारी शहरातील शोली पोल्ट्रीचे पक्षी भोपाळ येथे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. बर्ड फ्लू अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पशुसंवर्धन विभागामार्फत शुक्रवारी शोली पोल्ट्रीतील सर्व कुकुट पक्षी टप्प्याटप्प्याने नष्ट करण्याचे काम सुरू केले आहे. चार दिवसात शोली पोल्ट्रीतील कुकुट पक्षी नष्ट करण्यात येणार आहेत. पहिल्या दिवशी २० पशुसंवर्धन विभागातील पथकामार्फत ४४ हजार ९०२ कुकुट पक्षी कलिंग ऑपरेशन दरम्यान नष्ट करण्यात आले. उर्वरित एक लाख ९१ हजार ३०० कुकुट पक्षी तीन दिवसात नष्ट करणार येणार आहे. यात पशुसंवर्धन विभागातील २५० कर्मचारी व १७० खाजगी मजुरांचा समावेश आहे, अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकुर्णी यांनी दिली.

गेल्या एक महिन्यापासून नवापूर तालुक्यात बर्ड फ्लू संसर्गाने थैमान घातल्याने राज्यातील सर्वात मोठे कुकुट पक्षांचे कलिंग ऑपरेशन नवापूर तालुक्यात सुरू आहे. एकूण ३० पोल्ट्रीत बर्ड फ्लूग्रस्त पोल्ट्रीतील सात लाख कुकुट पक्षी नष्ट करण्यात आले आहे. नवापूर शहरात शुक्रवारी चार पोल्ट्रीतील अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पेरानीयार पोल्ट्रीत २८ हजार पक्षी, पॅराडाईज चार हजार ६०० पक्षी, रीची पोल्ट्रीत सहा हजार ५०० पक्षी, अशरफ पोल्ट्री १२ हजार पक्षी या चार पोल्ट्रीमधील एकूण ५१ हजार १०० कुकुट पक्षी व अंडी व नष्ट करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

नवापूर तालुक्यात आतापर्यंत एकूण ३० कुक्कुटपालन केंद्रातून सात लाख कुक्कुट पक्षी व २७ लाख अंडी बर्ड फ्लू आजारामुळे नष्ट करण्यात आले आहे. नवापूर तालुका बर्ड फ्लूचा महाराष्ट्र राज्यातील मोठा हॉटस्पाट ठरला आहे. नवापूर तालुक्यातील बर्ड फ्लूचे लोन थेट गुजरात राज्यासह नंदुरबार जिल्ह्यातील इतर तालुक्यातही पसरले आहे. नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय सुरू होता. परंतु बर्ड फ्लूच्या शिरकावाने पूर्ण कुक्कुटपालन व्यवसाय ठप्प झाला आहे. ३० पोल्ट्री व्यावसायिकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.

नवापूर शहरातील साधारणतः दररोज साडेसात लाख अंडी महाराष्ट्र-गुजरात राज्यात पाठवली जात होती. परंतु महिनाभरामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने नवापूर शहरातून अंडी पाठवण्यास बंदी घातल्याने गुजरात राज्यासह नाशिक विभागात अंड्याची टंचाई निर्माण झाली आहे.