म्हसावदला मोकाट गुरांकडून पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:59 IST2020-03-21T11:59:39+5:302020-03-21T11:59:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : म्हसावद गावात मोकाट गुरांचा सुळसुळाट झाला असून गावालगत असलेल्या शेतांमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

Mossavat cattle loss to Mhasavad | म्हसावदला मोकाट गुरांकडून पिकांचे नुकसान

म्हसावदला मोकाट गुरांकडून पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसावद : म्हसावद गावात मोकाट गुरांचा सुळसुळाट झाला असून गावालगत असलेल्या शेतांमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र पशूपालक बिनधास्त होऊन बघ्याची भूमिका घेत आहेत. याबाबत ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तीक कार्यवाही करून मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी म्हसावद ग्रामस्थांनी केली आहे. मोकाट गुरांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
याबाबत वृत्त असे की, म्हसावद गावासह गावालगत मोकाट गुरांचा सुळसुळाट झाला आहे. रात्री-बेरात्री मोकाट गुरांच्या झुंडीच्या झुंडी फिरतात. गावालगत असलेल्या शेतातील गहू, हरभरा, केळी व इतर पिकांचे नुकसान करीत आहेत. मोकाट गुरांच्या झुंडीच्या झुंडी असल्याने पीक खाण्यापेक्षा पायदळी पिकांचे जास्त नुकसान होत आहे. त्यांना पकडताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येते. गावातही मोकाट गुरे फिरत असल्याने मारण्याच्या भीतीने ग्रामस्थ धास्तावले आहेत. पशूपालक मात्र बिनधास्त झाले आहेत. काहीच होत नाही या आविर्भावात लांबूनच बघ्याची भूमिका बजावत आहेत. याबाबत ग्रामस्थ, शेतकरी यांच्या सहकार्याने म्हसावद ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने कडक कार्यवाही करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Mossavat cattle loss to Mhasavad