जिल्ह्यातील २०० पेक्षा अधीक शाळा खोल्या निर्लेखीत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 21:36 IST2020-03-08T21:36:04+5:302020-03-08T21:36:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील २०० पेक्षा अधीक शाळा खोल्या निर्लेखीत करून पुढील शैक्षणिक वर्षापासून त्या नवीन बांधून ...

More than 5 school rooms in the district will be demolished | जिल्ह्यातील २०० पेक्षा अधीक शाळा खोल्या निर्लेखीत करणार

जिल्ह्यातील २०० पेक्षा अधीक शाळा खोल्या निर्लेखीत करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील २०० पेक्षा अधीक शाळा खोल्या निर्लेखीत करून पुढील शैक्षणिक वर्षापासून त्या नवीन बांधून देण्यासाठी नियोजन करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, अशीच स्थिती अंगणवाडी इमारतींची देखील असून त्याबाबतही निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील अनेक भागातील शाळा खोल्यांची अवस्था अतीशय दयनिय आहे. सर्वाधिक शाळा खोल्यांची दूरवस्था ही सातपुड्यातील दुर्गम भागात आहेत. या शाळा खोल्या बांधकामासाठी विविध योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील शैक्षणिक वर्षात यातील निम्मेपेक्षा अधीक शाळा खोल्या बांधून मिळतील यासाठी नियोजन करण्यात येत आहे.
कुडाच्या घरात...
सातपुड्यातील अनेक गावांमधील शाळा या कुडाच्या घरात भरविल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्याची मानसिकता राहत नाही. शिक्षकांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दुर्गम भागातील अशा गाव व पाड्यांमध्ये जाण्यासाठी पक्के रस्ते नसल्यामुळे ही समस्या आहे. त्यावर उपाय म्हणून बांबू शाळेचा प्रयोग राबविण्याचे ठरविण्यात आले, परंतु तो देखील यशस्वी होऊ शकला नाही. नंतर फायबर शिटपासून शाळा खोल्या बांधण्याचे ठरविण्यात आले परंतु त्यालाही अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही.
पडक्या इमारती, गळके छत
अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील ५० पेक्षा अधीक शाळा खोल्या या गळक्या आहेत. पावसाळ्यात शिक्षकांना प्लॅस्टिक कागद किंवा ताडपत्री लावून गळती थांबवावी लागते. अशा वेळी मोठा अपघात होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे अशा शाळा खोल्या दुरूस्तीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला जातो, परंतु त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नाही.
खापर व परिसरातील सपाटीवरील गावांमधील शाळा खोल्यांची अवस्था देखील दयनिय आहे. त्याबाबतही ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.

४पावसाळ्यात बांधकाम करता येणार नाही. त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यातच बांधकामासाठी पाऊल उचलावे लागणार आहे. त्यामुळे लवकर निर्णय घेवून बांधकामास सुरुवात होणे अपेक्षीत आहे. परंतु तसे होणे सध्या तरी शक्य नसल्याची स्थिती आहे. परिणामी पुढील वर्षी तरी शाळा खोल्या मिळतील की नाही ही शंकाच आहे.

Web Title: More than 5 school rooms in the district will be demolished