शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मोलगी ग्रामपंचायत गैरव्यवहाराची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी गु्रपग्रामपंचायतीत झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीचा अहवाल बुधवारी प्राप्त झाल्यानंतर त्यावर कारवाई होणार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी गु्रपग्रामपंचायतीत झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीचा अहवाल बुधवारी प्राप्त झाल्यानंतर त्यावर कारवाई होणार असल्याचे आश्वासन जिल्हा परिषदेने दिल्यानंतर मोलगी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर सुरु केलेले उपोषण मागे घेतले़ मंगळवारी मोलगी ग्रामस्थांनी हे उपोषण सुरु केले होते़उपोषणकर्त्यांसोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, सभापती रतन पाडवी व जिल्हा परिषद सदस्य सीक़े़पाडवी यांनी चर्चा केली़ त्यानुसार मोलगी, उखल्लीपाडा, सोराचापाडा, बिजरीपाटी, निंबीपाडा या मोलगी ग्रुप ग्रामपंचायतींतर्गत पेसानिधी, ग्रामनिधी तसेच विविध विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत मोलगी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरु केले होते़ मंगळवारी झालेल्या या आंदोलनाची दखल घेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांनी त्यांची भेट घेत उपोषण मागे घेण्यास सांगितले़ बुधवारी गैरव्यवहाराच्या चौकशीचा अहवाल समोर येऊन १३ मार्चपर्यंत कामकाज होणार आहे़ त्यानंतर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले होते़ दरम्यान ग्रामविकास अधिकारी बागले यांच्यावरही कारवाईचे संकेत दिले गेले आहेत़