कोंबड्या नष्ट करण्याची मोहित तुर्तास स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:28 IST2021-02-15T04:28:04+5:302021-02-15T04:28:04+5:30

नवापूर : गेल्या रविवार अर्थात ७ फेब्रुवारीपासून नवापूरातील बर्ड फ्लू बाधीत पोल्ट्रीमधील कोंबड्या व अंडी नष्ट करण्याचे काम रविवारी ...

Mohit Turtas postponed to destroy hens | कोंबड्या नष्ट करण्याची मोहित तुर्तास स्थगित

कोंबड्या नष्ट करण्याची मोहित तुर्तास स्थगित

नवापूर : गेल्या रविवार अर्थात ७ फेब्रुवारीपासून नवापूरातील बर्ड फ्लू बाधीत पोल्ट्रीमधील कोंबड्या व अंडी नष्ट करण्याचे काम रविवारी थांबविण्यात आले. जिल्हाबाहेरील पथके आपापल्या जिल्ह्यात रवाना झाले आहेत. पोलीस बंदोबस्त देखील काढून घेण्यात आला आहे. दरम्यान, सात दिवसात २९ पैकी २४ पोल्ट्री फर्ममधील एकुण पाच लाख ७८ हजार ७९० कोंबड्या तर २५ लाख १३ हजार ३९२ अंडी नष्ट करण्यात आले.

नवापुरातील पोल्ट्री मध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याचा अहवाल शनिवार, ६ फेब्रुवारी रोजी प्राप्त झाला होता. दुसरऱ्याच दिवशी अर्थात ७ फेब्रुवारीपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना व बाधीत पोल्ट्रीमधील कोंबड्या नष्ट करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी जिल्ह्यातील व नाशिक विभागातील इतर जिल्ह्यातील असे एकुण ९१ पथकांद्वारे २४ पोल्ट्री फर्म मधील कोंबड्या व नंतर अंडी नष्ट करण्यात आले. पाच पोल्ट्रीमधील अहवाल प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे पुढील सुचना मिळेपर्यंत जिल्हाधिकारी यांनी कोंबड्या नष्ट करण्याची मोहिम तुर्तास थांबविण्यास सांगितली आहे.

नवापूर लगत गुजरातच्या सिमेवर तसेच विविध पोल्ट्रींमध्ये लावण्यात आलेला पोलीस बंदोबस्त देखील काढून घेण्यात आला आहे. पोल्ट्रीफर्म मालकांना वेळोवेळी परिसर निर्जंतूक करण्याच्या सुचना देखील देण्यात आल्या आहेत.

Web Title: Mohit Turtas postponed to destroy hens