मोगरा पाडवीचे उपकरण राष्टÑीय स्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 13:12 IST2020-02-16T13:12:19+5:302020-02-16T13:12:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात नंदुरबार येथील भाग्यचिंतन माध्यमिक विद्यालयाच्या मोगरा राजकुमार ...

Mogara Padvi equipment at national level | मोगरा पाडवीचे उपकरण राष्टÑीय स्तरावर

मोगरा पाडवीचे उपकरण राष्टÑीय स्तरावर

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात नंदुरबार येथील भाग्यचिंतन माध्यमिक विद्यालयाच्या मोगरा राजकुमार पाडवी या विद्यार्थिनीने ‘गरिबांचा कामोड’ हे उपकरण सादर केले होते. तिच्या या उपकरणाची राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.
गरिबांचा कमोड’ या उपकरणाद्वारे अत्यल्प कमी खर्चात घरगुती स्वरूपात वेस्टर्न कामोड बनविता येतो. तो गरोदर माता, दिव्यांग, वृद्ध, गरीब व गरजू व्यक्तींसाठी उपलब्ध होत असल्याचे मोगरा पाडवी हिने पटवून दिले. त्यामुळे राज्यातून राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनासाठी निवडण्यात आलेल्या तीन उपकरणांमध्ये मोगरा पाडवीच्या या ‘गरिबांचा कमोड’ नेही बाजी मारली आहे. या उपकरणाची राष्ट्रीयस्तरावर झालेल्या निवडीबद्दल मोगरा पाडवी व तिचे मार्गदर्शक शिक्षक भिका भोई, सचिन बागूल यांचे शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम, संस्थाध्यक्ष देवराम पाटील, सचिव मधुकर पाटील, मुख्याध्यापक राहुल खैरनार, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, कुंदन पाटील यांनी तिचे कौतुक केले आहे.

Web Title: Mogara Padvi equipment at national level