शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरीत मजूरांना परत आणणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पोट भरण्यासाठी शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या असंघटित मजुरांच्या समस्येवर सुरू असलेले राजकारण चुकीचे असून या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पोट भरण्यासाठी शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या असंघटित मजुरांच्या समस्येवर सुरू असलेले राजकारण चुकीचे असून या मजुरांना त्यांच्या मूळ गावात परत आणणे गरजेचे असल्याचे मत लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केले आहे़ परराज्यात अडकलेल्या मजूरांना परत आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी त्यांनी केली आहे़प्रतिभा शिंदे यांनी प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यानुसार स्थलांतरीत मजूर ज्या शहरांमध्ये काम करत आहेत़ त्याठिकाणी त्यांच्या राहण्याच्या जागा अत्यंत अस्वच्छ आणि अनारोग्यदायी आहेत़ लॉकडाऊन काळात अशा जागांमध्ये राहणे त्यांच्यासाठी नरकयातना समान आहे़ राज्यातील तसेच परराज्यातील शेती व ऊस कारखान्यातील मजूर शेत किंवा कारखान्यांच्या आवारात राहत आहेत़ त्याठिकाणी कोरोनाने अद्याप हातपाय पसलेले नाहीत़ अनेक मजूरांना मालकाने पूर्ण मजूरी न देताच काम बंद केले आहे़ शेतात मजूरी करणाऱ्या मजूरांना रोख मजूरी मिळणे बंद झाले आहे़ यातून त्यांची परवड वाढली आहे़ यामुळे शासनाने त्यांच्याकडे लक्ष देवून त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी म्हटले आहे़दरम्यान जे मजूर हिंमत करून पायी रस्त्यावर निघून पडलेत त्यांना रस्त्यात अडवून सरकारने निवारा गृहात ठेवले आहे़ ही माहिती मिळाल्यानंतर वाटेवर असलेल्या इतर मजूरांनी मिळेल त्या ठिकाणी राहणे पसंत केले आहे़ काही जण रस्त्यावर तर काही जण झाडांखाली राहून वेळ काढत आहेत़ यामुळे लहान बालके, गर्भवती माता यांचे प्रचंड हाल सुरु असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे़लगतच्या गुजरात राज्यासह मध्यप्रदेश राज्यात अडकलेल्या मजूरांना राज्य शासनाने वाहनांद्वारे आणण्यास काहीच हरकत नसल्याचे प्रतिभा शिंदे यांनी म्हटले आहे़ दरम्यान लोकसंघर्ष मोर्चाकडून जिल्ह्यातून परजिल्ह्यात तसेच परराज्यात गेलेल्या मजूरांचा आढावा घेण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे़