शेतीच्या वादातून म्हसावदला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:29 IST2021-05-22T04:29:11+5:302021-05-22T04:29:11+5:30

नंदुरबार : शेतीच्या वादातून म्हसावद येथे मारहाण झाली. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. म्हसावद येथील राजेंद्र ...

Mhaswad beaten up over agricultural dispute | शेतीच्या वादातून म्हसावदला मारहाण

शेतीच्या वादातून म्हसावदला मारहाण

नंदुरबार : शेतीच्या वादातून म्हसावद येथे मारहाण झाली. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

म्हसावद येथील राजेंद्र पाटील व माधव पाटील यांच्यात शेतीचा वाद होता. १८ रोजी माधव पाटील हे शेतात पपई पिकाची लागवड करीत होते. शेतीची हिस्से वाटणी न करता लागवड का करतात म्हणून विचारणा केली असता माधव पाटील यांनी जय राजेंद्र पाटील लाकडी दांडक्याने मारहाण केली. माधव पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी फिर्याद माधव पाटील यांनी दिली. राजेंद्र पाटील व जय राजेंद्र पाटील यांनी शेतातील ठिबक नळ्या फेकून व लागवड केलेल्या पपईचे नुकसान केले व मारहाण केली. त्यामुळे माधव पाटील यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र व जय पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Mhaswad beaten up over agricultural dispute