शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

मेवास अंकुश विहीर येथे अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:21 IST

जिल्हा महिला आणि बालविकास विभाग नंदुरबार यांना निनावी फोनद्वारे मेवास अंकुश विहीर येथे अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती ...

जिल्हा महिला आणि बालविकास विभाग नंदुरबार यांना निनावी फोनद्वारे मेवास अंकुश विहीर येथे अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती मिळाली होती. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या सूचनेनुसार बाल संरक्षण कक्ष नंदुरबार यांनी कार्यवाही केली. बाल संरक्षण अधिकारी गौतम वाघ यांनी गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक, आशासेविका, अंगणवाडी ताई, ग्राम रोजगार सेवक यांची एकत्रित भेट घेऊन सदर घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. या कारवाईत महाराष्ट्र राज्य महिला आयोग व जिल्हा परिषद नंदुरबारअंतर्गत असलेल्या जिल्हा समुपदेशन केंद्राचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर बालिका एकल पालक, अर्थात तिला आई नाही. बालिकेच्या वडिलांना विश्वासात घेऊन त्यांना ते करत असलेल्या गुन्हाबाबत समजावून सांगितले, तसेच बालविवाह प्रतिबंध कायद्यातील शिक्षेच्या तरतुदीबाबत संबंधितांना माहिती देण्यात आली. सदर बालिका १८ वर्षे होईपर्यंत लग्न करणार नाही, अशा आशयाची लेखी पालकांकडून करून घेतली आहे, तसेच सदर बालिकेला बाल कल्याण समितीसमोर सादर करण्याबाबत पालकांना सूचना करण्यात आली. बालिका आणि तिच्या १३ वर्षीय बहिणीसोबत चर्चा करण्यात आली व दोघींना बाल संगोपन योजनेविषयी माहिती देऊन सदर योजनेचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संबंधित समुदायाला बाल विवाहाचे दुष्परिणाम, कायद्यातील तरतुदी, अशा अनेक बाबींबाबत मार्गदर्शन केले. यावेळी या गावात बाल संरक्षण समिती कार्यान्वित करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. यासाठी अक्कलकुवाचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांचे सहकार्य लाभले. हवालदार भोये, पोलीस शिपाई गोसावी, समुपदेशक गौरव पाटील, जन साहस संस्थेचे जिल्हा समन्वयक विकास मोरे, समुपदेशक अनिता गावित उपस्थित होते. जिल्हा समुपदेशन केंद्राचे सहकार्य लाभले.