बालक दत्तक घेण्याविषयी समाजमाध्यमांवरील संदेश चुकीचे - महिला व बालविकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:32 IST2021-05-06T04:32:48+5:302021-05-06T04:32:48+5:30

नंदुरबार : राज्यातील विविध जिल्ह्यांतून कोविडमुळे दोन्ही पालक मृत्यू पावल्याने अनाथ झालेली बालके दत्तक घेण्यासाठी उपलब्ध असण्याबाबत समाजमाध्यमांद्वारे देण्यात ...

The message on social media about child adoption is wrong - women and child development | बालक दत्तक घेण्याविषयी समाजमाध्यमांवरील संदेश चुकीचे - महिला व बालविकास

बालक दत्तक घेण्याविषयी समाजमाध्यमांवरील संदेश चुकीचे - महिला व बालविकास

नंदुरबार : राज्यातील विविध जिल्ह्यांतून कोविडमुळे दोन्ही पालक मृत्यू पावल्याने अनाथ झालेली बालके दत्तक घेण्यासाठी उपलब्ध असण्याबाबत समाजमाध्यमांद्वारे देण्यात येणारे संदेश चुकीचे असून, अशारितीने बालके दत्तक दिल्यास ते बेकायदेशीर आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता, महिला व बालविकास आयुक्तालय आणि ‘सेव्ह द चिल्ड्रन’ यांच्या संयुक्त विद्यमाने मदत कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षाशी ८३०८९९२२२२ व ७४०००१५५१८ या क्रमांकावर सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत संपर्क साधावा.

कोविड अथवा इतर कोणत्याही कारणामुळे पालकांचा मृत्यू झाला असेल आणि बालकाला कोणीही नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसतील तर अशा बालकांसाठी वरील हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करण्यात यावा. बालकांसाठी यापूर्वी सुरु असलेली १०९८ ही हेल्पलाईनही उपलब्ध आहे. नागरिकांनी चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा महिला बालविकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी केले आहे.

Web Title: The message on social media about child adoption is wrong - women and child development