शिवसंपर्क अभियानांतर्गत शहादा येथे बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:20 IST2021-07-22T04:20:13+5:302021-07-22T04:20:13+5:30

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसंपर्क अभियानांतर्गत शहादा शहरासह तालुक्यातील सर्व गावांत संपर्क करण्यात ...

Meeting at Shahada under Shiv Sampark Abhiyan | शिवसंपर्क अभियानांतर्गत शहादा येथे बैठक

शिवसंपर्क अभियानांतर्गत शहादा येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसंपर्क अभियानांतर्गत शहादा शहरासह तालुक्यातील सर्व गावांत संपर्क करण्यात येत आहे. त्यानिमित्त येथे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, जिल्हा प्रमुख डॉ. विक्रांत मोरे, माजी जिल्हा सहसंपर्क प्रमुख दीपक गवते, माजी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी, जिल्हा उपप्रमुख रवींद्र गिरासे यांनी सांगितले की, संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विकासकामे करीत असून, राज्य शासनाची सर्व कामे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवा. शहरातील प्रत्येक प्रभागात व तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन सर्वसामान्य जनतेशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्या. या बैठकीला जि.प.चे माजी उपाध्यक्ष राम रघुवंशी, महिला आघाडी संपर्क प्रमुख विद्या साळी, महिला आघाडी जिल्हा प्रमुख रीना पाडवी, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, जिल्हा उपप्रमुख सखाराम मोते, युवासेना अधिकारी अर्जुन मराठे, नगरसेवक सुनील सोनार, नंदुरबार तालुका प्रमुख व्यंकट पाटील उपस्थित होते. या वेळी राजमल जैन, जावेद उस्ताद, तौसिफ भाई, वसीम तेली, विकी तेली, मुरलीधर वळवी यांच्यासह अनेकांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

या वेळी तालुका संघटक भगवान अलकरी, तालुका उपप्रमुख उत्तम पाटील, सागर पाटील, अविनाश पाटील, रमेश कुवर, बापू सूर्यवंशी, शहर उपप्रमुख गुलाब सुतार, विवेक भावसार, प्रकाश तिरमले, इद्रीस मेमन, माजी शहरप्रमुख दिलीप पाटील, सुरेश मोरे, तुषार पाटील, माजी नगरसेवक विनोद चौधरी, डॉ. जब्बार शेख, प्रकाश शिरसाठ, प्रदीप निकुंभे, प्रवीण सैंदाणे, प्रशांत नायक, राजू जैन, धनराज कोळी, डॉ. आगळे, युवासैनिक हृषीकेश शिवदे, वसीम अन्सारी, अक्षय वाडिले, सोहेल धनानी, जयेश पाटील, विक्रम माळी व शिवसैनिक उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा उपसंघटक मधुकर मिस्तरी यांनी केले. सूत्रसंचालन राजमल जैन यांनी तर आभार शहरप्रमुख रोहन माळी यांनी मानले.

Web Title: Meeting at Shahada under Shiv Sampark Abhiyan