अल्पसंख्याक विभागाशी संबंधित प्रश्नांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:43 IST2021-02-27T04:43:04+5:302021-02-27T04:43:04+5:30

या बैठकीस अल्पसंख्याक विभागाच्या अतिरिक्त सचिव जयश्री मुखर्जी, आमदार डॉ.सुधीर तांबे, नंदुरबार जिल्हा जमियत-ए-हिंदचे जिल्हाध्यक्ष मौलाना जकेरिया रहेमानी, उपाध्यक्ष ...

Meeting of questions related to the minority section | अल्पसंख्याक विभागाशी संबंधित प्रश्नांची बैठक

अल्पसंख्याक विभागाशी संबंधित प्रश्नांची बैठक

या बैठकीस अल्पसंख्याक विभागाच्या अतिरिक्त सचिव जयश्री मुखर्जी, आमदार डॉ.सुधीर तांबे, नंदुरबार जिल्हा जमियत-ए-हिंदचे जिल्हाध्यक्ष मौलाना जकेरिया रहेमानी, उपाध्यक्ष सैयद इसरार अली, सचिव इरफान मेमन, सहसचिव सैयद शाकीर अली व अल्पसंख्याक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत अल्पसंख्याक विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे, अनुदानासाठी पाच वर्षाची अट रद्द करुन १० वर्षापर्यंत अनुदान देणे, नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी उर्दू घरची स्थापना करणे, अल्पसंख्याक भवन बांधणे, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रीक व पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजनेतील त्रुट्या दूर करणे, शैक्षणिक कर्ज योजनेच्या धोरणांमध्ये सुधारणा करणे, नंदुरबार जिल्हा परिषद आणि नगरपालिकामधील उर्दूची रिक्त पदे विशेष बाब म्हणून तात्काळ भरणे, मौलाना आझाद आर्थिक विकास मंडळाचे कार्यालय नियमितपणे सुरू करणे, मदरसामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेचा लाभ देणे, पंतप्रधान स्वयंरोजगार व मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे या विषयांवर चर्चा करण्यात आली.

आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील अल्पसंख्याक विभागाशी संबंधित समस्यांची मांडणी केली. जमियतचे उपाध्यक्ष सैयद इसरार अली यांनी आकडेवारीसह संपूर्ण माहिती सादर केली. यावर अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव जयश्री मुखर्जी यांना तात्काळ कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या.

Web Title: Meeting of questions related to the minority section