गुर्जर महासभेतर्फे ३० गावांना वैद्यकीय कीट वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:32 IST2021-05-19T04:32:01+5:302021-05-19T04:32:01+5:30

महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या सागबारा व डेडीयापाडा या तालुक्यातील गावांमध्ये कोरोना जनजागृती व खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय कीट वाटपाचा उपक्रम ...

Medical pests distributed to 30 villages by Gurjar Mahasabha | गुर्जर महासभेतर्फे ३० गावांना वैद्यकीय कीट वाटप

गुर्जर महासभेतर्फे ३० गावांना वैद्यकीय कीट वाटप

महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या सागबारा व डेडीयापाडा या तालुक्यातील गावांमध्ये कोरोना जनजागृती व खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय कीट वाटपाचा उपक्रम गुर्जर महासभेने घेतला आहे. आदिवासींचे कुलदैवत याहामोगी माता मंदिर असलेल्या देवमोगरा या गावापासून वाटपाचा शुभारंभ झाला. यावेळी गुर्जर महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते कीट वाटपाचा शुभारंभ झाला. प्रमुख अतिथी म्हणून महासभेचे गुजरात प्रदेश अध्यक्ष मोहनभाई पटेल, गुजरात प्रदेश कार्याध्यक्ष जगदीशभाई पटेल, सुभाष पटेल, भरत पटेल, भूपेंद्र पटेल, विजय विठ्ठल पाटील, पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी हेमंत पवार, सुभाष वसावा यांच्यासह विविध गावातील सरपंच, शाळांचे मुख्याध्यापक व पदाधिकारी उपस्थित होते. सागबारा तालुक्यातील देवमोगरा, गोड्डा, पाडा, मोठी मोगरी, लहान मोेगरी, काकडीमहू, नलकुंड, कुवरखाडी, मुंडवाल, सिमनीपदर, कणपाडा, देविदाव, दंडवडी, शिशपुरा, तिखुनिया तसेच डेडीयापाडा तालुक्यातील बेसाणा, खुर्डी, रालडा, सिंगलोटी, मोतींगलोटी, खतम, छकीमली, बाल, गाडी, जुनामोसडा, छचड, पंचकुमार, पिपला, पंसर, नामगीर या गावांना वैद्यकीय कीटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन गुर्जर महासभेचे पदाधिकारी व प्राचार्य डॉ.लतेश चौधरी यांनी केले. आभार मोहनभाई पटेल यांनी मानले.

Web Title: Medical pests distributed to 30 villages by Gurjar Mahasabha