Meat shops closed in Nandurbar | मांस विक्रेत्यांची दुकाने नंदुरबारात केली बंद

मांस विक्रेत्यांची दुकाने नंदुरबारात केली बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मांस विक्रीची दुकाने बंद करण्याच्या सुचना दिलेल्या असतांना देखील नंदुरबारातील विविध भागात सुरू असलेली मांस विक्रीची दुकाने पालिकेने कारवाई करीत बंद केली. या शिवाय १३८ पान टपरींना सील करण्यात आले.
नंदुरबारातील मलकवाडा, घोडापीर मोहल्ला, शास्त्री मार्केट, धुळे चौफुली, बोहरी गल्ली, मच्छी मार्केट, मण्यार मोहल्ला, पटेलवाडी या भागात मांस विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर पालिका कर्मचाऱ्यांनी तेथे जात दुकाने बंद केली. यापुढे एकही मांस विक्रीचे दुकान सुरू न ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, नंदुरबारात १३८ पान टपरी सील करण्यात आल्या. याशिवाय शहादा येथे ३७, नवापूर येथे २५, तळोदा येथे ५५ पान टपरी सील करण्यात आल्या आहेत. लपून, छपून कुणी गुटखा, पान विक्री करीत असल्याचे दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Meat shops closed in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.