शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सीएए व एनआरसी समर्थनार्थ भव्य मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) कायद्याच्या समर्थनार्थ गुरुवारी शहरात राष्ट्रीय ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) कायद्याच्या समर्थनार्थ गुरुवारी शहरात राष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या वतीने विशाल जनमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विविध राजकीय पक्षाचे नेते, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. केंद्र शासनाने पारित केलेल्या दोन्ही कायद्यांच्या समर्थनार्थ मोर्चेकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिक नोंदवही हे दोन कायदे भारतीय संसदेने लोकसभा व राज्यसभेत बहुमताने मंजूर झाले. या दोन्ही कायद्यांना समर्थनासाठी गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहरातील प्रेस मारुती मंदिर मैदान परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली. दुपारी बारा वाजेपासून या परिसरात विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. राष्ट्रीय सुरक्षा मंचचे अध्यक्ष डॉ.वसंत पाटील, आमदार राजेश पाडवी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, राजेंद्र गावीत, डॉ.शशिकांत वाणी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजय शर्मा, डॉ.कांतीलाल टाटीया, माजी नगरसेविका रेशमबाई दुरंगी,महिला आघाडीच्या कल्पना पंड्या, वकील संघटनेचे अ‍ॅड.भरत मराठे यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.प्रेस मारुती मैदानातून मोर्चा बसस्थानक मार्गे नगरपालिकेला वळसा घालून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आल्यानंतर तेथे मोर्चाचे रूपांतर विशाल सभेत झाले. यावेळी हिंदू एकता मंचचे हिरामण गवळी म्हणाले की, हा कायदा खºया भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेकरता महत्त्वाचा असून यामुळे देशात असलेल्या घुसखोरांना देशाबाहेर काढणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे अफगाणिस्तान, पाकिस्तान व बांगलादेश या तिन्ही देशातील अल्पसंख्याक नागरिकांना आपल्या देशात नागरिकत्व देता येणे शक्य होणार असल्याने आम्ही हजारोंच्या संख्येने केंद्र शासनाच्या या दोन्ही कायद्यांचे जाहीर समर्थन करतो, असे मनोगत यावेळी विविध मान्यवरांनी व्यक्त केले.मोर्चेकऱ्यांच्या वतीने नायब तहसीलदार आर.एस. कुरेकर, मंडळ अधिकारी प्रमोद अमृतकर यांना देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा : लोकसभा व राज्यसभेत हे दोन्ही कायदे मंजूर झाले असून राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. हा कायदा कोणत्याही जाती-धर्माला विरोध करणारा नाही. या कायद्यामुळे सर्व भारतीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असल्याने केंद्र शासनाने या दोन्ही कायद्यांची संपूर्ण देशात लवकरात लवकर अंमलबजावणी करावी यासाठी आम्ही या कायद्याला पाठिंबा दर्शवित आहोत, असे म्हटले आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला होता.प्रकाशा येथेही रॅलीसुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) कायद्याच्या समर्थनार्थ प्रकाशा ग्रामस्थांतर्फे रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध पक्ष, संघटना, संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. या कायद्यांना समर्थन दर्शविणारे फलक हाता घेऊन विविध घोषणा देण्यात आल्या. रॅलीचे रूपांतर सभेत झाले. वि.का. संस्थेचे अध्यक्ष हरी पाटील म्हणाले की, राष्ट्रहितासाठी नागरिक संशोधन कायद्याला पाठींबा देणे गरजेचे आहे. मात्र याला ठिकठिकाणी विरोध दर्शविण्यात येऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले. पोलीस व संरक्षक दलाच्या जवानांना नाहक अपमानास्पद वागणूक देण्यात आली. या कृत्याच्या जाहीर निषेध करीत आहोत, असे सांगितले. भटू वसंत शिंपी यांनीही मनोगत व्यक्त केले.शहादा येथे गुरुवारी सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) या कायद्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात येणार असल्याने दुपारी बारा वाजेपासून शहरातील सर्व व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपले व्यवसाय बंद ठेवले होते. व्यवसाय बंद ठेवून व्यापारी संघटनांचे पदाधिकारी वकील संघटनांचे पदाधिकारी, डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी, नागरी हक्क संरक्षण समिती, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यासह विविध स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चेकºयांच्या हातात या कायद्याचे समर्थन करणारे बॅनर व पोस्टर तर १०० मीटर लांबीचा तिरंगा हे प्रमुख आकर्षण ठरले.