शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात दोन ठिकाणी वीज चोरी उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा शहरात वीज कंपनीच्या पथकाच्या कारवाईत दोन ठिकाणी वीज चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा शहरात वीज कंपनीच्या पथकाच्या कारवाईत दोन ठिकाणी वीज चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत़ दोन वर्षापासून वीज चोरी होत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीसात गुन्हा दाखल झाला आह़े वीज कंपनीचे सहायक अभियंता संजीत खंडू पाटील यांनी सप्टेंबर महिन्यात शहरातील शिवराम मंदीर रोडवरील फिरोजखान हमीदखान पठाण या ग्राहकाच्या वीज मीटरची तपासणी केली होती़ तपासणीत वीज मीटर मंद गतीने सुरु असल्याचे दिसून आल्यानंतर तपासणीसाठी काढून घेतले होत़े दरम्यान पथकाने  डोंगरगाव रोडवरील विजय उद्धव भामरे यांच्या राहत्या घरातील वीज मीटर संथ गतीने सुरु असल्याचे दिसून आले होत़े येथे तपासणी करुन मीटर ताब्यात घेतले होत़े दोन्ही ठिकाणाहून ताब्यात घेतलेल्या मीटर तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर फिरोजखान पठाण याने दोन वर्षात 3 हजार 31 युनिट तर विजय भामरे या वीज ग्राहकाने 3 हजार 220 युनिट वीज चोरी केल्याचे उघड झाले होत़े यातून कंपनीने दोघांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता़  याप्रकरणी संजीत पाटील यांनी शनिवारी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन फिरोजखान याच्याविरोधात आणि विजय उद्धव भामरे व इंदूबाई उद्धव भामरे या दाम्पत्यविरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पाडवी करत आहेत़