शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मंगल कार्यालये लग्न मुहूर्ताच्या काळातही ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:59 IST

तालुक्यातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी अधिक जरी होत असली तरी नागरिकांच्या मनातील भीती कायम असल्याने मुहूर्ताच्या काळात मंगल ...

तालुक्यातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी अधिक जरी होत असली तरी नागरिकांच्या मनातील भीती कायम असल्याने मुहूर्ताच्या काळात मंगल कार्यालये नोंदणीच्या प्रतीक्षेत आहेत. तर दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची धास्ती कायम असल्याने मंगल कार्यालय मालक, व्यवस्थापक, मंडप सजावटवाले आणि कामगारांच्या चिंता पुन्हा वाढल्या आहेत.

शासनाने नियमावलीमध्ये शिथिलता आणत मंगल कार्यालयाना ५० जणांच्या उपस्थितीत मंगल कार्यालयात साखरपुडा अथवा विवाह समारंभाला परवानगी दिली आहे. परंतु दिवाळीच्या नंतर झालेल्या कोरोना रुग्णांच्या वृद्धीने अनेकांच्या चिंता वाढल्या आहेत. दिवाळी अगोदर कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने अनेकांनी आपला साखरपुडा अथवा विवाह समारंभ उरकून घेण्याची तयारी दाखवली होती. यासाठी अनेक मंगल कार्यालयात आगावू नोंदीसुद्धा झाल्या. परंतु दिवाळीनंतर अनेकांनी आपली नोंदणी रद्द करत आपले समारंभाचे तारीख पुढे ढकलले आहेत.

जोडधंद्यावरही परिणाम

लग्न सराईत चालणाऱ्या जोडधंद्यावरही त्याचा परिणाम झाला आहे. मंडप डेकोरेटर्स, कॅटरर्स, जेवण बनविणारे कारागीर, मदतनीस अशा हजारो जणांना याचा फटका सहन करावा लागत आहे. आधीच लाॅकडाऊनच्या काळात काम नसल्याने आर्थिक फटका सहन करणारे हे व्यावसायिक येत्या काळात व्यवसाय नसल्याने हवालदिल झाले आहेत.

फेब्रुवारी व मार्चची नोंदणी रद्द

कोरोणाच्या धास्तीने अनेकांनी केवळ घरच्या घरी आपले समारंभ आटोपण्याचे ठरविले असल्यानेदेखील नोंदणी रद्द झाल्याचे मंगल कार्यालय चालकांनी सांगितले. त्याच बरोबर अनेकांनी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्याची आगावू नोंदणी केली होती. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती या महिन्यांत वर्तवली असल्याने या महिन्यांतील नोंदणीसुद्धा रद्द होत आहेत. शासनाने परवानगी दिली असली तरी नोंदणी होत नसल्याने मंगल कार्यालयांचे मालक चिंतेत आहेत.