कोठली ग्रामपंचायतीवर महिला राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:32 IST2021-02-16T04:32:44+5:302021-02-16T04:32:44+5:30

कोठली त.सा. ग्रामपंचायतीचा कारभार आता महिला कारभारी पाहणार आहेत. या ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनलचे आठ सदस्य निवडून ...

Mahila Raj on Kothali Gram Panchayat | कोठली ग्रामपंचायतीवर महिला राज

कोठली ग्रामपंचायतीवर महिला राज

कोठली त.सा. ग्रामपंचायतीचा कारभार आता महिला कारभारी पाहणार आहेत. या ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत ग्रामविकास पॅनलचे आठ सदस्य निवडून आले आहेत. लोकशाही पॅनलला एका जागेवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत गोकूळबाई भालेराव पाटील या दोन वाॅर्डातून विजयी झाल्या आहेत. सरपंच व उपसरपंच निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.एस. जडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. त्यात सरपंच व उपसरपंचपदासाठी प्रत्येकी एक-एक अर्ज आल्याने सरपंचपदी गोकूळबाई भालेराव पाटील तर उपसरपंचपदी नम्रताबाई सरदारसिंग गिरासे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास पॅनलचे प्रमुख राहुल भालेराव पाटील, मोनीराज भालेराव पाटील, माजी सरपंच प्रकाश फकिरा पाटील, हंबरसिंग जतनसिंग गिरासे, रवींद्र दला कोळी, भुरु लालसिंग भिल, बाबू सुक्राम ठाकरे, सुधाकर मधुकर मालचे, पतींग हनुमंत साळवे, निंबा गिरासे, प्रवीण गिरासे, कपिल मंडळे, सागर मंडळे यांनी आठ जागांवर सदस्य निवडून आणले. या वेळी ग्रामसेविका योगिता निकम व पोलीस पाटील सुकदेव पाटील यांनी निवडणूक कामात सहकार्य केले. सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Mahila Raj on Kothali Gram Panchayat