मोफत तांदूळ मिळवून देण्याच्या अमिषाने दोघांनी केली वृद्धेची सोनपोत लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:28 IST2021-05-22T04:28:55+5:302021-05-22T04:28:55+5:30

तळोदा- मोफत पाच किलो तांदूळ मिळवून देण्याचे आमिष दाखवून वृद्ध महिलेच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र दोघा ...

In the lure of getting free rice, the two made an old man's gold lamp | मोफत तांदूळ मिळवून देण्याच्या अमिषाने दोघांनी केली वृद्धेची सोनपोत लंपास

मोफत तांदूळ मिळवून देण्याच्या अमिषाने दोघांनी केली वृद्धेची सोनपोत लंपास

तळोदा- मोफत पाच किलो तांदूळ मिळवून देण्याचे आमिष दाखवून वृद्ध महिलेच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र दोघा भामट्यांनी हातचलाखीने लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी मुख्य रस्त्यावर घडली.

शहरातील खान्देशी गल्लीतील ७० वर्षीय वृद्धा इंदूबाई सुदाम सूर्यवंशी या शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता आंबे घेण्यासाठी बाजारपेठेत गेल्या होत्या. पाठीमागून दोन अज्ञात भामट्यांनी त्यांना वाटेतच थांबवून आजी गावातील रेशन दुकानावर पाच किलो मोफत तांदळाचे वाटप सुरू आहे. आम्ही मोफत तांदूळ मिळवून देतो, असे सांगत त्यांनी वृद्धेस मेनरोडवरील विठ्ठल मंदिरासमोरील लहानशा बोळीत घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी त्या वृद्ध महिलेला सांगितले की, आजी तुमच्या गळ्यातील सोन्याची पोत पाहून तुम्ही गरीब दिसणार नाहीत म्हणून तुम्हाला मोफत तांदूळ दिले जाणार नाहीत, असे सांगत त्यांनी आजीला गळ्यातील सोन्याची पोत पिशवीत ठेवण्यास सांगितले नंतर दोघांनी हातचलाखी करत सोन्याची पोत लंपास केली नंतर ते दोघेही तेथून पसार झाले. पिशवीतील पोत वृद्ध महिलेने पहिली असता ती चोरीस गेल्याचे समजले तोपर्यंत दोघांनी तेथून पळ काढला. पोलिसांना घटना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. हवालदार अजय कोळी व युवराज चव्हाण यांनी बाजारपेठेतील ज्वेलर्स व इतर दुकानांतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम उशिरापर्यंत केल्यानंतर त्यात एक भामटा या वृद्ध महिलेला बाजारातून कोपऱ्याच्या गल्लीत घेऊन जाताना दिसत असल्याचे सांगण्यात आले. याबाबत तळोदा पोलिसांत उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: In the lure of getting free rice, the two made an old man's gold lamp