शहाद्यातून चोरी झालेला ऐवज फिर्यादीकडे सुुपुर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST2021-07-23T04:19:29+5:302021-07-23T04:19:29+5:30

पोलीस सूत्रानुसार, शहरातील रामनगर भागात भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जितेंद्र जमदाळे व त्यांचे कुटुंब हे वास्तव्यास आहेत. १ ...

Loot stolen from martyrdom handed over to plaintiff | शहाद्यातून चोरी झालेला ऐवज फिर्यादीकडे सुुपुर्द

शहाद्यातून चोरी झालेला ऐवज फिर्यादीकडे सुुपुर्द

पोलीस सूत्रानुसार, शहरातील रामनगर भागात भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जितेंद्र जमदाळे व त्यांचे कुटुंब हे वास्तव्यास आहेत. १ मे रोजी दुपारनंतर सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान जमदाडे कुटुंब घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. घरात कुणी नाही ही संधी साधत चोरट्यांनी दरवाजा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेली रोख रक्कम एक लाख ५० हजार व २८ ग्रॅम सोने बाजारातील सध्याच्या भावानुसार एक लाख २७ हजार असा सुमारे दोन लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज चोरांनी चोरून नेला होता. याबाबत जितेंद्र जमदाळे यांनी शहादा पोलीस स्टेशनला चोरी झाल्याची फिर्याद देऊन पोलिसात नोंद झाली होती. चोरीची घटना मोठी असल्याने पोलिसांपुढे चोरट्यांना पकडण्याचे आव्हान होते. शहाद्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी तपासाची चक्रे सुरू केली. नंदुरबार जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी शहादा पोलिसांच्या सहकार्याने आरोपींची शोधमोहीम सुरू केली व दीड महिन्याच्या आत सात आरोपींना पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून चोरून नेलेल्या मुद्देमालापैकी रोख रक्कम रुपये ८० हजार व २८ ग्रॅम सोने असा ऐवज जप्त केला. शहादा पोलीस प्रशासनाने आरोपींकडून जप्त केलेला ऐवज न्यायालयाच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे व पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी फिर्यादी जितेंद्र जमदाळे यांच्याकडे सुपुर्द केला.

Web Title: Loot stolen from martyrdom handed over to plaintiff