शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
4
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
6
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
7
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
8
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
9
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
10
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
11
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
12
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
13
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
14
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
15
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
16
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
17
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
18
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
19
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
20
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना आता टोळधाडीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोना या महामारीच्या आर्थिक सावटातून अजूनही शेतकरी सावरलेला नाही. तोच गुजरात व मध्यप्रदेशातून येणाºया ...

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : कोरोना या महामारीच्या आर्थिक सावटातून अजूनही शेतकरी सावरलेला नाही. तोच गुजरात व मध्यप्रदेशातून येणाºया टोळधाड या किटकांचा प्रादुर्भाव आपल्याकडे येण्याची दाट शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. ही कीड मुख्यता कोणत्याही पिकाचा व फळांच्या हिरव्या पाल्यावर हल्ला चढवित शेतच्या शेत एका रात्रीतून उद्ध्वस्त करीत असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आतापासूनच भर पडली आहे. कृषी विभागाने कापूस लागवड अथवा खरीप पेरणी पूर्वीच याप्रकरणी आतापासूनच उपाययोजनांबाबत शेतकºयांमध्ये प्रत्यक्ष जनजागृती करावी, अशी अपेक्षा आहे.
गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोनाच्या महामारीने आपल्या देशाबरोबरच संपूर्ण जग ढवळून निघाले आहे. या महामारीचा फटका सर्वच क्षेत्र झेलत आहेत. त्यातच शेतकरी वर्गाला तर मोठ्या प्रमाणात सोसावा लागला आहे. तरीही त्याच्या सावटातूनच कसा बसा सावरट नाही. तोच गुजरात-मध्यप्रदेशाकडून येणाºया टोळधाड या तीन कीटकांचा प्रादुर्भाव राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव या खान्देशातील तीन जिल्ह्यांसह या राज्याच्या सीमावर्ती असलेल्या १० जिल्ह्यांमध्ये पसरण्याची दाट शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. त्यासाठी स्थानिक तालुका कृषी प्रशासनास त्याचा प्रादुर्भाव थोपविण्यासाठी अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
साहजिकच यामुळे शेतकºयांच्या चिंतेत भर पडली आहे. नाकतोड्या सारखी असणाºया या किटकांचा थवाचा थवा एका शेताचा संपूर्ण फडशा पाडल्यानंतर लगेच प्रादुर्भाव करतो. एका रात्रीतून जवळपास १० ते १२ किलो मीटर अंतर क्षेत्रफळावरील क्षेत्रात त्याचा प्रादुर्भाव होत असतो. म्हणजे एवढे फळबाग असो अथवा इतर कोणत्याही पिकाचे संपूर्ण हिरवे पानेच खाऊन टाकतो. त्यामुळे संपूर्ण पीकच नष्ट होत असते. त्याचबरोबर फुले, फळे, बिया, फादी व पालवी याचाही फडशा पाडत असतो. वास्तविक शेतकºयांनी आताच खरीप हंगामापूर्वीची मशागतीची कामे युद्ध पातळीवर प्रयत्न करून पूर्ण केली आहेत. सद्या कपाशीच्या लागवडीत शेतकरी सज्ज झाला आहे. परंतु कृषी विभागाने टाळधाडेचा इशारा दिल्यामुळे शेतकºयांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. काय करावे अशा विवंचनेत शेतकरी पडला आहे. आता तालुका कृषी विभागाने शेतकºयांच्या पेरण्या व कापूस लागवडी पूर्वी आपल्या कृषी कर्मचाºयांच्या माध्यमातून जनजागृती करण्याची गरज आहे. त्यासाठी कशा उपाययोजना कराव्यात या विषयीचे प्रत्यक्ष जागेवर जावून शेतकºयांना प्रशिक्षण दिले पाहिजे. त्याच बरोबर किडीचा प्रादुर्भावाबाबत सातत्याने आढावा घेण्याचीही आवश्यकता आहे. ही टाळधोड पर्यावरणासाठीदेखील हानीकारक ठरू शकते, असे कृषी विभागाने म्हटले आहे. या किडीचा धोकेदायक प्रादुर्भाव लक्षात घेऊन कृषी विभागानेही अधिक सजग राहण्याची अपेक्षा शेतकºयांनी केली आहे.

ही टोळ तांबूस रंगाची असते. अत्यंत खादाड व नुकसान करणारी आहे. एका टोळधाडीत असंख्य टोळ असतात. त्यामुळे त्यांचे थवे तयार होत असतात. हे थवे वाटेतील वनस्पतींचा म्हणजे पिकांचा फडशा पाडत पुढे सरकत जातात. सायंकाळ झाल्यावर झाडा-झुडपांमध्ये वस्तीत राहतात. एक चौरस कि.मी. क्षेत्रात जर टोळधाड असेल तर त्याचात तीन हजार क्विंटल टोळ असतात.

टोळने अंडी घातलेल्या जागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास पिकांना अटकाव करून नियंत्रणात आणता येते. संध्याकाळी, रात्रीच्या वेळी, झाडा-झुडपांवर टोळ जमा होतात. अशा वेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळून धूर केल्याने नियंत्रणात येते. थव्यांच्या स्थितीत पिलांची संख्या जात असल्यास नीम तेल प्रतिहेक्टरी अडीच लिटर फवारणी करावी. मिथील पॅराथीआॅन दोन टक्के भूकटी २५ ते ३० किलो प्रति हेक्टरी धुरळणी करावी. त्याचबरोबर प्रत्येक गावातील शेतकºयांनी स्वत: गट तयार करावेत. रात्री शेतात पाहणी व देखरेख करावी. रात्री लाखोंच्या संख्येने टोळ शेतात उतरतात. त्यामुळे डब्बे, पत्रे, ढोल सायरन व ट्रॅक्टरचा आवाज करणे याशिवाय थवे येतांना दिसल्यास मशाली किंवा टेंभे लावून त्यांना हाकलून लावावे.

गुजरात-मध्य प्रदेश व राज्यस्थानात मोठा प्रादुर्भाव असलेल्या या टोळधाड किटकाच्या आपल्याकडे येण्याचा अलर्ट देण्यात आला आहे. मुख्यता पिके, फळबागांच्या हिरव्या पानांवरच अ‍ॅटॅक करून पिके उद्ध्वस्त करतात. शेतकºयांनी आतापासूनच सावध राहून उपाययोजनांबाबत कृषी कार्यालयाशी संपर्क करावा.
- नरेंद्र महाले, तालुका कृषी अधिकारी, कृषी कार्यालय, तळोदा

कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी मालामुळे कवडी मोल किंमतीत माल विकावा लागल्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच आता टोळधाड किटकांचा प्रादुर्भाव वाढण्याच्या शक्यतेमुळे शेतकºयांची चिंता वाढली आहे. अजून पेरणी व कापूस लागवड बाकी असल्यामुळे उपाययोजनांसाठी कृषी विभागाने शेतकºयांना प्रत्यक्ष प्रशिक्षण द्यावे.
-हेमंत उगले, शेतकरी, रांझणी, ता.तळोदा