लॉकडाऊनमुळे परीट धोबी समाजाची घडी विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:32 IST2021-05-06T04:32:57+5:302021-05-06T04:32:57+5:30

गेल्या वर्षाच्या लाॅकडाऊनमधून काही प्रमाणात सावरत नाही तोच याही वर्षी पुन्हा लॉकडाऊन लागल्यामुळे व्यवसाय हा पूर्णपणे बंद ...

The lockdown shook the Parit Dhobi community | लॉकडाऊनमुळे परीट धोबी समाजाची घडी विस्कटली

लॉकडाऊनमुळे परीट धोबी समाजाची घडी विस्कटली

गेल्या वर्षाच्या लाॅकडाऊनमधून काही प्रमाणात सावरत नाही तोच याही वर्षी पुन्हा लॉकडाऊन लागल्यामुळे व्यवसाय हा पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे लॉन्ड्री व्यावसायिक व कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामध्ये दुकान भाडे, लाइट बिल कसे भरावे, हा मोठा प्रश्न आहे. ९० टक्के समाज हा या व्यवसायावर अवलंबून आहे. खूपच वाईट परिस्थितीमध्ये परीट संमाजबांधव आहे. राज्य शासनाने आमचा विचार करून आम्हाला मदत द्यावी. जसे रिक्षावाले व बांधकाम मजुरीसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे, त्यामध्ये आमचाही विचार करून आम्हालाही मदत द्यावी व यावर्षीचे सहा महिन्यांचे लाइट बिल माफ करावे, अशी मागणी धोबी समाजाकडून मागणी करण्यात येत आहे.

मागील महिन्यापासून लॉन्ड्री व्यावसायिकांची दुकाने बंद असल्याने कपडे धुणे व इस्त्री यासाठी लोक येत नाही. सरकारने जशी इतर घटकांतील लोकांना आर्थिक मदत जाहीर केली, तशी लॉन्ड्री व्यावसायिकांनाही देण्यात यावी तसेच चालू वर्षीचे येणारे लॉन्ड्री व्यावसायिकांची वीजबिले माफ करावे. - विनोद धोबी, लॉन्ड्री व्यावसायिक, शहादा

Web Title: The lockdown shook the Parit Dhobi community