शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन सातबारा बसला मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील धवळीविहीर येथील १६३ शेतकरी आपल्या ‘ड’ पत्रकासाठी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून तालुका ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील धवळीविहीर येथील १६३ शेतकरी आपल्या ‘ड’ पत्रकासाठी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून तालुका महूसल प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत असून, त्यांना कुठलीही दाद दिली जात नाही. आता तर जिल्हा प्रशासनाकडूनच देण्याचे आदेश नसल्याचे स्थानिक प्रशासन सांगते. त्यामुळे इकडे ‘ड’ पत्रकाअभावी शेतकऱ्यांना पीक कर्ज अथवा इतर योजनांपासून उपेक्षित राहावे लागत असल्याने शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आले आहेत. जिल्हा प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेऊन ठोस कार्यवाही करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.दरम्यान दोन दिवसांपूर्वी या शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन त्यांनाही साकडे घातल्याचे शेतकºयांनी सांगितले.तळोदा तालुक्यातील धवळीविहीर येथील १६३ शेतकºयांची आपल्या मालकीच्या जमिनीची नोंद महसूल विभागाकडे केली आहे. त्यानुसार या शेतकºयांना संबंधीत तलाठ्याकडून सातबारा, फेर-फार नोंदीदेखील मिळत होत्या. मात्र शासनाने शेतकºयांना डिजिटल सातबारा व त्यावरील फेर-फार नोंदीचे ‘ड’ पत्रक महसूल प्रशासनाकडून मिळत नसल्याचे या शेतकºयांचे म्हणणे आहे. गेल्या दीड दोन वर्षांपासून ते प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्यावर कार्यवाही सुरू आहे. मिळतील असे मोघम उत्तर संबंधीतांकडून त्यांना देण्यात येते. ‘ड’ पत्रकासाठी सतत कार्यालयात हेलपाटे मारून दमछाक झाल्याचे हे शेतकरी सांगतात. तरीही कुणीच दाद देत नाही. आता तर जिल्हा प्रशासनाकडूनच आदेश नसल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय जोपर्यंत आदेश येत नाही तो पावेतो ‘ड’ पत्रकावरील फेरफार नोंदी होणार नसल्याचेदेखील सांगण्यात आल्याचे शेतकरी म्हणतात. वास्तविक शासनाने शेतकºयांना डिजिटल सातबारा व त्यावरील नोंदीसाठी फेरफार होऊ नये म्हणून त्यांना तत्काळ सातबारा उपलब्ध होण्यासाठी आॅनलाईन प्रणालीतून डिजिटल सातबारा देण्याचा चांगला उपक्रम हाती घेतला आहे. मात्र धवळीविहीर येथील शेतकºयांना आॅनलाईन सातबाºयाचा फटका बसला आहे. कारण ही प्रणाली लागू झाल्यापासून त्यांच्या फेरफार नोंदी घेण्याची प्रक्रियाच थांबली आहे. यापूर्वी त्यांना आॅफलाईनही कागदपत्रे तलाठ्यांकडून मिळत होती. डिजिटल सातबाºयाचा शासनाचा हेतू चांगला असला तरी उदासिन स्थानिक प्रशासनाच्या कार्यवाहीमुळे ही प्रणाली शेतकºयांच्या मुळावरच बसली असल्याची व्यथा शेतकºयांनी बोलून दाखविली.जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी गंभी दखल घेऊन शेतकºयांचा प्रश्न मार्गी लावावा. विशेष म्हणजे या शेतकºयांची १९८० पासूनची नोंद महसूल प्रशासनाकडे असल्याचे शेतकºयांनी सांगितले. १५ दिवसात यावर ठोस कार्यवाही झाली नाही तर या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाादेीखल त्यांनी दिला आहे.

४सातबारा उताऱ्यावर बँकांच्या पीक कर्जाचा बोजा चढविण्याचा नियम असल्यामुळे त्या आशयाचा नोंदी होत नसल्याने जिल्हा बँका, राष्टÑीयकृत बँका व पीक कर्ज सोसायट्या आम्हाला कर्ज देत नाही. बँकांचा बोजा चढविल्याशिवाय शासनाचे स्वस्त पीककर्जदेखील मिळत नाही. नाईलाजास्तव खाजगी सावकाराकडून अधिक व्याजाने पैसे आणून शेती करावी लागत असते. विशेषत: वडिलोपार्जीत जमिनीवर मयत वारसदार कमी करणे तसेच वारस लावणे ही प्रक्रियाही करता येत नाही. साहजिकच अनेक अडचणी आम्हा शेतकऱ्यांपुढे निर्माण झाल्या आहेत. या शिवाय आदिवासी शेतकºयांसाठी असलेल्या शासनाच्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. वास्तविक ‘ड’ पत्रक सारख्या शेतकºयांची महत्त्वाची कागदपत्र महसूल प्रशासनाने तत्काळ उपलब्ध करणे आवश्यक असतांना त्यासाठी आम्हाला सलग दोन वर्षांपासून हेतूता फिरवा-फिरव करीत आहे, असा आरोप या शेतकºयांनी केला आहे. जिल्हा प्रशासनाने तत्काळ याप्रकरणी गांभीर्याने घेऊन संबंधीतांना तंबी द्यावी, अशी मागणी देविसिंग पावरा, अमृतसिंग पावरा, रायसिंग पावरा, तिरसिंग पावरा, मनिलाल पावरा, राहुल पाडवी, भगतसिंग पावरा, नागेश पावरा यांनी केली आहे.