शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खैरवे धरणाची गळती थांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 13:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : खैरवे धरणाच्या उजव्या कालव्याजवळ भगदाड पडल्यामुळे नुकसान झाले. या नुसानीची आमदार शिरीष नाईक यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : खैरवे धरणाच्या उजव्या कालव्याजवळ भगदाड पडल्यामुळे नुकसान झाले. या नुसानीची आमदार शिरीष नाईक यांनी पाहणी केली. धरणातील पाण्याच्या गळतीमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते तर परिसरातील शेतीचेही मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची आमदार नाईक यांनी पाहणी केली. यावेळी सरपंच रिना दिनेश गावीत, उपअभियंता सुभाम गावीत, ग्राम पंचायत सदस्य अरुण गावीत, हेमंत नाईक व  शेतकरी  आदी उपस्थित होते. सरपंच व ग्रामस्थांनी संबंधित विभागाचे अधिकारी यांना पाण्याच्या गळतीबाबत अवगत करुनही अधिकारी नसल्याने लहान गळतीमुळे मोठे भगदाड पडल्याची बाब ग्रामस्थांनी निदर्शनास आणुन दिली. या गळीतमुळे धरणाच्या आजू-बाजूच्या शेतात पाणी शिरल्याने उभ्या पीकांचे मोठे नुकसान झाले होते. संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे बळीराजाचे नुकसान झाल्याने संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यामुळे  आमदार नाईक यांनी संबंधितांवर कारवाईचे संकेत दिले आहे. आमदार नाईक यांनी वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करून या प्रकरणी चौकशीचे आश्वासन दिले. शेतांमधे पाणी शिरल्याने उभ्या पीकांचे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची सुचना त्यांनी तहसिलदार यांना केली. धरण फुटल्याच्या अफवेमुळे नवापूर तालुक्यातील चिमणीपाडा, आसालीपाडा, बोरचक, शेगवे आदी गावातील ग्रामस्थ भयभीत झाले होते. सात जेसीबी यंत्राद्वारे काल सायंकाळी गळती बंद करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. पाऊस सुरु असल्याने त्यात व्यत्यय येत होता. रात्री उशिरार्पयत गळती बंद करण्यात जलसंपदा विभागाला यश आले होते. सद्यस्थितीत धरण सुरक्षित असून घाबरण्याचे काहीही कारण नाही. दुरूस्तीचे काम पुर्ण झाले असुन धरणाला कोणताही धोका नसल्याची माहिती सहाय्यक अभियंता सुमन गावीत यांनी दिली.