शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

हिवताप प्रतिरोध महिना उपक्रमाचा सोमावल येथे शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:21 IST

या उपक्रमांतर्गत पावसाळ्यात उत्पन्न होणाऱ्या विविध कीटकजन्य रोगांची माहिती, आजारांची लक्षणे, घ्यावयाची काळजी, प्रतिबंधक उपाय व मार्गदर्शक सूचना आदींची ...

या उपक्रमांतर्गत पावसाळ्यात उत्पन्न होणाऱ्या विविध कीटकजन्य रोगांची माहिती, आजारांची लक्षणे, घ्यावयाची काळजी, प्रतिबंधक उपाय व मार्गदर्शक सूचना आदींची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया रुग्णांच्या संख्येत वाढ झालेल्या कार्यक्षेत्रावर विशेष लक्ष असणार आहे. जागतिक महामारी ठरलेल्या कोरोना संसर्ग उद्रेकाच्या वेळी ग्रामीण भागात जी परिस्थिती ओढावली गेली त्याची पार्श्वभूमी लक्षात घेता, बहुतांश कीटकजन्य आजारांची लक्षणे व करोना आजारांची लक्षणे मिळतीजुळती असल्याने, नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊ नये, यासाठी तळोदा तालुक्यातील सोमावल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी व डॉक्टरांनी पुढाकार घेतला आहे. एनव्हीडीसीपी दिल्ली, आरोग्यसेवा (हिवताप) विभाग नाशिक व जिल्हा हिवताप कार्यक्रम नंदुरबार यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार ‘हिवताप प्रतिरोध महिना’ उपक्रम राबविण्यात सुरुवात झाली आहे. या उपक्रमांतर्गत मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना संशयित तापाचे रुग्णांचे गावपातळीवर आशा कार्यकर्ती, आरोग्यसेवक यांच्यामार्फत नियमितपणे हिवतापासाठी रक्त नमुने गोळा करणे, डेंग्यू, चिकुनगुनिया तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तालुकास्तरावरील आरोग्य यंत्रणेकडे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविणे, दूषित रक्त नमुने रक्तजल नमुने आढळून आल्यास, राष्ट्रीय उपचार धोरणानुसार संबंधित रुग्णांना उपचार देणे आवश्यक असल्यास, टेलिमेडिसीनचा वापर वेळोवेळी करणे, उद्रेकग्रस्त भागात नियमित कीटकनाशक फवारणी व कीटकनाशक भारित मच्छरदाणीचे वाटप करणे, कीटकजन्य आजाराविषयी जनजागरण मोहिमेत पथनाट्य व भित्तीपत्रके लावणे आदींविषयी प्रतिबंधात्मक कार्यवाहीची अंमलबजावणी करणार आहेत.

सोमावल येथे या उपक्रमांतर्गत झालेल्या कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर ठाकरे, डॉ.हरीश वसावे, मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ.छाया पाडवी, के.एस. कुवर, सामुदायिक आरोग्य अधिकारी भावना ढोलार, हर्षदा चौधरी, आरोग्य सहायिका ए.व्ही. कुवर, आरोग्य सहायक एस.ए. ठाकरे, आर.डी. आगळे, आरोग्यसेविका मनीषा पावरा, गीता पाडवी, जयश्री वसावे, मनीषा साळवे, करण पाडवी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांना एस.ए. ठाकरे यांनी जनजागृती पत्रक वाटप करून माहिती दिली.