शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

देशातील सर्वात मोठे बर्ड फ्लू किलिंग ऑपरेशन नवापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:43 IST

बलेसरिया यांनी पोल्ट्री व्यवसायासाठी जर्मन तंत्रज्ञान वापरले होते. एका शेडमध्ये साधारण तीन कोटीची मशीनरी वापरली आहे. त्यासाठी काढलेले कोट्यवधी ...

बलेसरिया यांनी पोल्ट्री व्यवसायासाठी जर्मन तंत्रज्ञान वापरले होते. एका शेडमध्ये साधारण तीन कोटीची मशीनरी वापरली आहे. त्यासाठी काढलेले कोट्यवधी रुपयांचे कर्ज आता फेडायचे कसे? हा गहन प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. डोळ्यांदेखत कोट्यवधींचा व्यवसाय नेस्तनाबूत होताना बलेसरिया यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. हे किलिंग ऑपरेशन थांबणार कधी? मोठ्या इच्छाशक्तीने उभारलेला कोट्यवधींचा पोल्ट्री उद्योग नंतर कसा उभा राहणार? हे व असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आहेत. सध्या तरी उघड्या डोळ्यांनी हृदयावर दगड ठेवून कोंबड्याचे किलिंग ऑपरेशन पाहण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्यायच शिल्लक नाही. पोल्ट्रीतील लाखो कुकुट पक्ष्यांचा कू-कू आवाज शांत झाल्याने पोल्ट्रीत स्मशान शांतता पसरली. पोल्ट्री व्यावसायिक चिंतातूर झाले आहेत.

कोरोनाच्या संकटाबरोबर देशात बर्ड फ्लूचे संकट आले. राज्यातही अनेक ठिकाणी बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचे सिद्ध झाले आहे. पण याचा सगळ्यात मोठा फटका नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्‍यात बसला. येथे सध्या देशातील सगळ्यात मोठे किलिंग ऑपरेशन सुरू आहे. साधारण दोन टप्प्यात पोल्ट्रीतील कुकुट पक्षी नष्ट करण्यात आले. पहिल्या टप्प्यात २२ पोल्ट्रीतील साडेपाच लाख कुकुट पक्षी व २५ लाख अंडी नष्ट करण्यात आली. त्यानंतर बर्ड फ्लूची लागण शेजारील गुजरात राज्यातील नॅशनल पोल्ट्रीत झाली. येथे १७ हजार कुकुट पक्षी व ४८ हजार अंडी नष्ट करण्यात आली. येथील बर्ड फ्लूचा अहवाल एच ५एन १ घातक होता. नवापूर शहरातील बर्ड फ्लू एच ५एन ८ सामान्य विषाणू होता. नवापूर शहरातील बर्ड फ्लू २५ किलोमीटर विसरवाडी येथे पोहोचला आहे. तेथील तीन पोल्ट्रीत २० हजार कुकुट पक्षी व लाखो अंडी नष्ट करण्यात आली. त्यानंतर नवापूर शहरातील उर्वरित पाच पोल्ट्रीतील कुकुट पक्ष्यांचे अहवाल तीनवेळा निगेटिव्ह आले. कुठल्या पोल्ट्रीत पक्ष्यांची मरतूक नव्हती. परंतु अचानक मरतूक झाल्याने उर्वरित पाच पोल्ट्रीत बर्ड फ्लू अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शुक्रवारी चार पोल्ट्रीतील ५१ हजार कुकुट पक्षी नष्ट करण्यात आली. त्यानंतर नवापूर शहरातील सर्वात मोठी शोली पोल्ट्रीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोल्ट्री व्यावसायिक चिंतातूर झाले. कारण याठिकाणी साधारण दोन लाख ३७ हजार कुकुट पक्षी व ३० लाख अंडी आहेत. नवापूर तालुक्यातील सर्वाधिक नुकसान शोली पोल्ट्रीत होणार आहे.