आगाऊ रक्कम फेडण्यासाठी ऊसतोड कामगारांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:29 IST2020-02-06T12:28:43+5:302020-02-06T12:29:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नशिबी आलेल्या दारिद्र्यामुळे ऊसतोड कामगारांना पोटासाठी मुकादमांकडून आगाऊ रक्कम घ्यावी लागते. ही रक्कम न ...

The laborers rush to pay the advance | आगाऊ रक्कम फेडण्यासाठी ऊसतोड कामगारांची धावपळ

आगाऊ रक्कम फेडण्यासाठी ऊसतोड कामगारांची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नशिबी आलेल्या दारिद्र्यामुळे ऊसतोड कामगारांना पोटासाठी मुकादमांकडून आगाऊ रक्कम घ्यावी लागते. ही रक्कम न फेडल्यास दुपटीने रक्कम भरावी लागते. दुपटीची रक्कम टाळण्यासाठी या कामगारांची धावपळ सुरू असून त्यांची वसाहत दिवसभर ओस पडते.
बेताच्या परिस्थितीत जीवन जगणारे चाळीसभाव, कन्नड, मालेगाव, साकी व धडगाव या भागातून ऊसतोड कामगार नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर या साखर कारखान्याच्या क्षेत्रात दाखल झाले आहेत. मुळगावापासून मैलो दुर असलेल्या या ठिंकाणी ऊसतोडणीचे काम करताना या कामगारांना अनेक वेदना सहन कराव्या लागत आहे. काही ऊसतोड कामगार बीड जिल्ह्यातूनही आल्याचे दिसून येत आहे. साखर कारखाने सुरू असल्याने सर्व मजूर तेथेच ऊस तोडत तेथेच वास्तव्याला आहे.
पोटाची आग शमविण्यासाठी हे कामगार साप, विंचवांचेही भय ते बाळगीत नाही. मुकादमाकडून घेतलेली उचल न फिटल्यास मुकादमास व्याजासह ती रक्कम परत करावी लागते. या भीतीने घेतलेली उचल फेडणे हाच ध्यास मजुरांपुढे असतो. अशावेळी त्यांना वेळेवर जेवण तर सोडाच दोन वेळचे ताजे अन्नही मिळत नाही. अनेक वेळा शिळ्या अन्नावरच अवलंबून राहावे लागते. ऊसाच्या शेतात ऊस तोडताना उसाच्या बुडक्या व कोयते लागून अनेक कामगार जखमी होतात. परंतु त्याकडे दुर्लक्ष करीत असून केवळ रोजच्या कामाकडे लक्ष देत आहे.

 

Web Title: The laborers rush to pay the advance