शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
4
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
5
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
6
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
7
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
8
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
9
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
10
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
11
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
12
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
13
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
14
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
15
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
16
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
17
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
18
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
19
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
20
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषित बालकांची सेवा देणारे कुलकर्णी दाम्पत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 11:59 IST

सुनील सोमवंशी । लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरात गेल्या ४२ वर्षापासून वैद्यकीय सेवा देणारे डॉ.शशांक कुलकर्णी व डॉ.अलका ...

सुनील सोमवंशी ।लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरात गेल्या ४२ वर्षापासून वैद्यकीय सेवा देणारे डॉ.शशांक कुलकर्णी व डॉ.अलका कुलकर्णी यांची कुपोषित बालकांसंदर्भातील सामाजिक कार्य वाखाणण्याजोगे असून या कार्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे.डॉ.शशांक कुलकर्णी यांनी वैद्यकीय सेवेबरोबरच सामाजिक कार्यासाठी आदर्श प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली असून त्या माध्यमातून डॉ.कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या पत्नी डॉ.अलका कुलकर्णी हे दाम्पत्य कुपोषण निर्मूलनाची मोहीम राबवत आहे. या कार्यात त्यांना मुंबईच्या आय.आय.टी. व शबरी सेवा समिती या संस्थांची मदत मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यात बालकुपोषणाचे प्रमाण जास्त असल्याने अशा कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करुन त्यांना स्वत:च्या हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेतात. या बालकांच्या उपचारासाठी १२ खाटांचा स्वतंत्र कक्ष आहे. गेल्या १० वर्षापासून हा उपक्रम सुरु असून शेकडो बालकांवर येथे मोफत उपचार करण्यात आले आहेत. सहा महिने ते पाच वर्ष वयोगटातील कुपोषित बालकांना संस्थेतर्फे मोफत औषधी, खेळणी व सकस आहाराचे वाटप करण्यात येते. सर्व रुग्णांच्या रक्त व लघवी तपासण्या, एक्स-रे व गरज भासल्यास टू डी एको, रक्त, लघवीची तपासणी, सी.टी. स्कॅन, रक्तपुरवठाही केला मोफत जातो. दवाखान्यातून सुटी झाल्यावरही सोया दूध पावडर व सुमारे महिनाभर पुरेल एवढा आहार पालकांना सोबत दिला जातो. शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता या संस्थेतर्फे आतापर्यंत जिल्ह्यात ४१ आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली असुून या शिबिरातून हजारो रुग्णांची मोफत तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले.कुपोषण निर्मूलनाबरोबरच इतर वैद्यकीय सेवाही गरीब रुग्णांसाठी मोफत उपलब्ध करून देतात. २०१२ मध्ये हर्निया झालेल्या रुग्णांसाठी घेण्यात आलेल्या शिबिरात ६० तर २०१३ मध्ये ४४ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. इंग्लंड येथील डॉ.अँन्ड्रयू किंग, जर्मनीचे डॉ. हॅन्स लायरल आणि अमेरिकेचे डॉ.अर्ल डेव्हीड व डॉ.सी. कार्बर यांनी शहाद्यात येऊन हर्निया शिबिरात रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या होत्या. या कार्यात त्यांना त्यांचे पुत्र डॉ.दर्शन कुलकर्णी व स्नुषा डॉ.मालविका कुलकर्णी ह्या सहकार्य करतात.डॉ.शशांक कुलकर्णी यांना सामाजिक कार्याची व नाट्य क्षेत्रात आवड असल्याने त्यांनी सामाजिक विषयावर प्रकाशझोत टाकणाऱ्या अनेक नाटकातून अभिनय केला आहे. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे ते माजी जिल्हाध्यक्ष असून ग्रामीण भागात असलेल्या अंधश्रध्दा मिटवण्यासाठीही त्यांनी अनेक उपक्रम अंनिसच्या माध्यमातून राबविले आहेत. अंधश्रध्दा मिटविण्यासाठी अंनिसचे कार्यकर्ते घडवण्यासाठी प्रशिक्षण शिबिरांचेही त्यांनी आयोजन केले आहे.