घोटाण्यात शेतबांधावरुन फुटली डोकी निघाला चाकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:23 IST2020-05-27T12:23:06+5:302020-05-27T12:23:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील घोटाणे येथे दोन कुटूंबात तुंबळ हाणामारी होवून एकावर चाकून वार करण्यात आला़ बांधावरील ...

A knife broke out from the farm in Ghotana | घोटाण्यात शेतबांधावरुन फुटली डोकी निघाला चाकू

घोटाण्यात शेतबांधावरुन फुटली डोकी निघाला चाकू

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील घोटाणे येथे दोन कुटूंबात तुंबळ हाणामारी होवून एकावर चाकून वार करण्यात आला़ बांधावरील सामाईक झाड आणि चारी या वादाचे कारण असून शनिवारी सकाळी साडेआठ वाजता हा प्रकार घडला होता़
सुदाम रोहिदास गोसावी व भटू रामदास गोसावी यांच्या कुटूंबात ही झडप झाली होती़ गोसावी कुटूंबाच्या सामाईक शेतबांधावरील झाड व पाणी भरण्याची चारी तोडल्याचे तसेच बांध फोडल्याच्या जाब विचारण्यावरुन वादाला सुरुवात झाली होती़ यातून झालेल्या हाणामारीत गजानन रोहिदास गोसावी याच्या शरीरावर चाकूने वार करुन जखमी करण्यात आले़ तसेच सुदाम गोसावी यांनाही मार बसला दरम्यान हाणामारीत भालचंद्र गोसावी, सरलाबाई गोसावी व भटू गोसावी हे तिघेही जखमी आहे़ भालचंद्र गोसावी यांच्या फिर्यादीवरुन सुदाम, गजानन, राकेश गोसावी, कृष्णा गोसावी, शामराव गोसावी, शरद गोसावी, देविदास गोसावी यांच्या विरोधात तर सुदाम गोसावी यांच्या फिर्यादीवरुन भटू, भालचंद्र आणि सरलबाई गोसावी यांच्याविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़

Web Title: A knife broke out from the farm in Ghotana