शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यातील डोंगरी शेतीत खरीपाची पेरणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : सातपुड्याच्या पर्वत रांगात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे पेरण्या व मशागतीच्या कामांना वेग ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : सातपुड्याच्या पर्वत रांगात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे पेरण्या व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. सातपुड्यातील आदिवासी बांधव आपल्या शेत शिवारातील कामात व्यस्त असल्याचे पाहायला दिसून येत आहे.मागील दोन ते तीन दिवसांपासून दुपारच्या सुमारास सातपुड्याच्या पर्वत रांगेत वसलेल्या धडगाव तालुक्यातील चांदसैली, माळ, पिंपळबारी, उखळीआबा यांच्यासह सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या तळोदा तालुक्यातील कोठार, वरपाडा, अंबागव्हाण इत्यादी परिसरात गेल्या तीन दिवसापासून दुपारच्या सत्रात कुठे दमदार तर कुठे तुरळक प्रमाणात दररोज पाऊस हजेरी लावत आहे. या पावसाच्या हजेरीमुळे सातपुड्यातील शेतकरी सुखावला असून, पेरणीच्या कामाला वेग आला आहे.खरीप हंगामात सातपुड्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ज्वारी, मका, तूर या सारख्या पिकांची लागवड करीत असतात. काही शेतकरी कापसाचीदेखील लागवड करणे पसंत करतात. पावसाच्या हजेरीमुळे जमिनीत पेरणी योग्य ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे तर पहिल्या पावसानंतर लगेच पेरणी केलेल्या शेतकऱ्यांकडून तसेच पेरणीची तयारीत असणाºया शेतकºयांनी मशागतीच्या कामांना वेग दिला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव असून, शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. अश्या परिस्थितीत कुटुंबातील लहान मोठे सर्व जण शेतात काम करतानाचे चित्र सातपुड्यात पाहायला मिळत आहे. कुटुंबातील लहान मुलेदेखील शेतात मदत करताना दिसून येत आहेत. शेतीचे मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले असले तरी सातपुड्यातील आदिवासी बांधव मात्र पारंपरिक पद्धतीने पेरणी व मशागतीचे कामे करणे पसंद करतात. पारंपरिक शेतीची औजारे वापरून पेरणी व मशागत करतानाचे दुर्मिळ चित्र सद्या सातपुड्यात पाहायला मिळत आहे.सातपुडा पर्वत रांगेत दरवर्षी पहिल्या पावसानंतर मोठ्या प्रमाणात हिरवळ पसरते. लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यापासून घरात थांबून असलेल्या नागरिकाना सातपुड्यातील हिरवळ आकर्षिक करू लागली आहे. गेल्या आठवड्यात दोन ते तीनदा पावसाने हजेरी लावल्याने सातपुड्यात सर्वत्र हिरवळ दिसायला सुरूवात झाली आहे. त्यातच दुपारच्या सत्रात बरसणाºया पावसाच्या सरी गारवा निर्माण करीत असल्याने आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे उत्साही तरूणांची पावले पर्यटनासाठी सातपुड्याच्या पर्वत रांगांकडे वळू लागली आहे.