गुजरात राज्यातून आडमार्गाने महाराष्ट्रात खादगी बसेस रवाना; ग्रामस्थांनी केला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:32 IST2021-05-19T04:32:03+5:302021-05-19T04:32:03+5:30

नवापूर तालुक्यातील आमलाण गावातून अनेक खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस जात असल्याने गावकऱ्यांनी जाणाऱ्या गाड्यांना अडविल्याने यावेळी मोठा गोंधळ ...

Khadgi buses depart from Gujarat by direct route to Maharashtra; The villagers protested | गुजरात राज्यातून आडमार्गाने महाराष्ट्रात खादगी बसेस रवाना; ग्रामस्थांनी केला विरोध

गुजरात राज्यातून आडमार्गाने महाराष्ट्रात खादगी बसेस रवाना; ग्रामस्थांनी केला विरोध

नवापूर तालुक्यातील आमलाण गावातून अनेक खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस जात असल्याने गावकऱ्यांनी जाणाऱ्या गाड्यांना अडविल्याने यावेळी मोठा गोंधळ उडाला होता. नवापूर पोलिसांनी त्या ठिकाणी जात त्या बसला गुजरात राज्यात परत पाठविले. रात्रीच्या वेळी नागपूर-सुरत महामार्गावर वाहनांची गर्दी दिसत आहेत. यात काही खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे असे प्रकार वारंवार घडत असल्याचे बोलले जात आहे. नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी महाराष्ट्र व गुजरात सीमावर्ती भागात बंदोबस्त करीत आहेत; परंतु खासगी बसेस गुजरात राज्यातील उच्छल, बाबरघाट आडमार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करीत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमावलीकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: Khadgi buses depart from Gujarat by direct route to Maharashtra; The villagers protested