शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
2
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
3
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
4
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
5
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
6
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
7
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
8
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
9
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
10
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
12
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
13
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
14
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
15
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
16
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
17
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्तीचा आनंद अवघा २४ तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सोमवारी सायंकाळपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर जिल्हावासीयांनी सुटकेचा नि:श्वास घेतला होता. नवीन ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सोमवारी सायंकाळपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर जिल्हावासीयांनी सुटकेचा नि:श्वास घेतला होता. नवीन रुग्ण आढळून येवू नये असे सर्व मनोमन इच्छा व्यक्त करीत असतांना मंगळवारी रात्री रजाळे, ता.नंदुरबार येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. संबधीत रुग्ण मुंबई येथील कांदीवली भागातून आलेला आहे.
रुग्णाच्या संपर्कातील पाच जणांचे स्वॅब घेण्यात आले असून दूय्यम संपर्कातील नऊ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, नंदुरबार येथील एक खाजगी रुग्णालय सील करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात आता कोरोनाचे एकुण २२ रुग्ण झाले आहेत. १९ जण कोरोनामुक्त झाले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण बामखेडा, ता.शहादा येथील असून ते नाशिक येथे पॉझिटिव्ह आढळून आले व तेथेच उपचार घेत आहेत.
कांदीवली येथून आले...
रजाळे येथील ६४ वर्षीय पॉझिटिव्ह रुग्ण चार दिवसांपूर्वी कांदीवली, मुंबई येथून आले आहेत. तेथे मुलीकडे ते गेले होते. लॉकडाऊनमध्ये ते तेथेच अडकले. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर चार दिवसांपूर्वी तेथे खाजगी वाहनाने गावी पोहचले. गावी आल्यावर त्यांना सतत ताप येत असल्याने त्यांनी नंदुरबार येथील दिनदयाल चौकातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. परंतु ताप उतरत नसल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना कोरोनाची लक्षणे आढळताच त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला. मंगळवारी रात्री त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
१४ जणांना केले क्वॉरंटाईन
रुग्णाच्या संपर्कातील पाच व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दुय्यम संपर्कातील ९ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. याशिवाय रुग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासून आणखी काही जणांना क्वॉरंटाईन करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
रजाळे येथे कोरोनाबाधीत रुग्ण असल्याचा अहवाल येताच प्रशासन तेथे रात्रीच दाखल झाले. रात्रीच उपाययोजना सुरू करण्यात आल्या. गावात जंतूनाशक फवारणी करण्यात आली आहे. बॅरीकेटींग देखील केली गेली आहे. गाव पाच दिवस संपुर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्रीच वाढीव पोलीस बंदोबस्त देखील तैणात करण्यात आला. गावातील तरुणांनी स्वयंस्फूर्तीने विविध भागातून गावात येणाऱ्या रस्त्यांवर काटेरी झुडपे टाकून रस्ते बंद केले आहेत. सरपंच व पोलीस पाटील हे ग्रामस्थांना सुचना देत आहेत.
आरोग्य सेविकांतर्फे घरोघरी जावून ग्रामस्थांची तपासणी करण्यात येत आहे. गाव प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे तर लगतचे बलवंड गाव हे बफर झोन म्हणून राहणार आहे. त्यानुसार आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असून सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


मुंबईहून आलेला रजाळेचा रुग्णाने आधी नंदुरबारातील मध्यवर्ती चौकातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतला होता. सारखा ताप येत असल्याने त्यांनी रुग्णालयात उपचार घेतले. ताप उतरत नसल्याने त्यांनी जिल्हा रुग्णालयात तपासणी केली. तेथे त्यांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेवून अ‍ॅडमीट करून घेतले होते. खाजगी रुग्णालयात रुग्ण अ‍ॅडमीट नव्हता. केवळ ओपीडीमध्ये तपासणी करण्यात आली होती. लक्षण आढळल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. रुग्णालयात कोरोनासंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना आहेत.


ई-पास अंतर्गत अनेकजण दुसऱ्या गावातून, शहरातून येत आहेत. ई-पासच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने किती लोकं जिल्ह्यात येत आहेत. कुठे येत आहेत याचा डाटा ठेवला तर सोयीचे होणार आहे. प्रतीबंधीत व रेड झोनमधून येणाºया लोकांची सक्तीने आरोग्य तपासणी करून त्यांना होम क्वॉरंटाईन करणे गरजेचे आहे. परंतु तसे होत नाही. अनेकजण खोटी माहिती सांगून गावांमध्ये, शहरांमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यामुळे ई-पास घेणाऱ्यांचा डाटा ते जात असलेल्या शहर किंवा जिल्ह्यातील संबधीत यंत्रणेकडे राहणे देखील आवश्यक आहे. आता यापुढील काळात जे पॉझिटिव्ह रुग्ण आढळतील ते अशाच स्वरूपातील राहणार असल्याने प्रशासनाने सतर्क राहावे शिवाय त्या त्या भागातील नागरिकांनी, गावातील जबाबदार व्यक्तींनी आपल्या भागात कोण नवीन व्यक्ती आला त्याची माहिती घ्यावी. प्रतिबंधीत व रेड झोनमधील असल्यास त्यांना आरोग्य तपासणी करणे सक्तीचे करावे अशी मागणी पुढे येत आह.