शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

बाईक ॲम्ब्युलन्सचा प्रवास खडतरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST

नंदुरबार : ४० दिवसांपूर्वी सेवेत दाखल झालेल्या दहा बाईक ॲब्युलन्समधून आतापर्यंत २५ पेक्षा अधिक रुग्ण जवळच्या आरोग्य ...

नंदुरबार : ४० दिवसांपूर्वी सेवेत दाखल झालेल्या दहा बाईक ॲब्युलन्समधून आतापर्यंत २५ पेक्षा अधिक रुग्ण जवळच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहेत. त्यात प्रसूतीसाठीच्या महिला आणि सर्पदंश झालेल्या रुग्णांचा अधिक समावेश आहे. सातपुड्यातील पायवाट आणि ओबडधोबड रस्त्यांवरून चालवतांना मात्र रुग्णाला त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, ॲब्युलन्स दिल्या असल्या तरी चालकांना पेट्रोलसाठी ना पैसे दिले ना लॅागबुक दिले गेले आहे.

जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यतील सातपुड्यातील गाव, पाड्यांमधील भौगोलिक रचना लक्षात घेता रुग्णांना नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यासाठी झोळीचा अर्थात स्थानिक भाषेत ‘बांबूलन्स’चा आधार घ्याव लागतो. त्यावर उपाय म्हणून देशातील ईशान्येकडील राज्याच्या धर्तीवर ‘बाईक ॲम्ब्युलन्स’चा प्रयोग करण्यात येत आहे. ४० दिवसांपूर्वी १० बाईक ॲम्ब्युलन्स सेवेत दाखल झाल्या आहेत.

या बाईक ॲम्ब्युलन्ससाठी एकूण ६६ लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. त्यात दोन वर्षांसाठी देखभाल व दुरुस्ती, चालकाचे मानधन, इंधन व प्रशिक्षण आदी खर्चाचा समावेश आहे. निती आयोगाच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

१० आरोग्य केंद्राअंतर्गत ७२ गावे

बाईक ॲम्ब्युलन्स दहा आरोग्य केंद्रांअंतर्गत देण्यात आल्या आहेत. साधारण ७२ गावांना त्या सेवा पुरविणार आहेत. राजबर्डी केंद्राअंतर्गत त्रिशुल येथे ॲम्ब्युलन्स राहत असून त्या अंतर्गत राजबर्डी, कामोद, खर्डी, कुकलट, शेलकुवी, चिकल्टी, शिंदवाणी, कुवरखेत, जामण्याखेत व कात्रा ही गावे आहेत.

तेलखेडी केंद्राअंतर्गत वेलखेडी येथे ॲम्ब्युलन्स उभी राहते. या अंतर्गत सिपाणपाडा, सेलबारे, जुगणी, पेचरीपाडा, पिपलपाडा, सिपाणबारीपाडा, तेलखेडी महाराज, मोजरा, मोडलगाव ही गावे आहेत.

झापी आरोग्य केंद्राअंतर्गत सिंदी येथे ॲम्ब्युलन्स राहते. यात झापी, खडकी, मांजणी, तोरणमाळ, फलई, सिंदीदिगर, भाबरी, उडद्या, कुंड्या, मुरवाणी व सावऱ्यालेकडा ही गावे आहेत.

रोषमाळ बुद्रूक आरोग्य केंद्रात शेलगदा येथे ॲम्ब्युलन्स राहते. आकवाणी, कुकतार, कुंभरी, बिलायापाडा, नलगव्हाण, गुराडी, पिपरापाणी, शेलगदा, अठ्ठी ही गावे येतात.

कात्री केंद्राअंतर्गत माकडकुंड येथे ॲम्ब्युलन्स उभी राहते. या अंतर्गत कात्री व परिसर आहे.

मांडवा आरोग्य केंद्राअंतर्गत डेब्रामाळ येथे ॲम्ब्युलन्स राहते. मांडवी बुद्रूक, मांडवी खुर्द, खडक्या, मोवडाबीपाडा, रूईमालपाडा, बादरपाडा, बेबडदा, कलमसपाडे, डसपिड्यापाडा, गुगलमाल ही गावे आहेत.

डाब आरोग्य केंद्राअंतर्गत वालंबा येथे ॲम्ब्युलन्स असते. असली, पाटबारा, गदवानी व मेवड ही गावे आहेत.

काठी आरोग्य केंद्राअंतर्गत वणवाईपाडा येथे ॲम्ब्युलन्स उभी असते. जमाना, केलवाणी, वाहवाणी, नोलदा, ओटवी, ओंडवा, पौला, माकडकुंड ही गावे येतात.

पिंपळखुटा आरोग्य केंद्राअंतर्गत बालापाट येथे ॲम्ब्युलन्स उभी असते. या अंतर्गत सुरगस, जुगलखेत, बालाघाट, बर्डी, वेहगी, खोडसबार, बारीसुरगस, तोलवापाडा ही गावे येतात. तर जांगठी आरोग्य केंद्राअंतर्गत गमन येथे ॲम्ब्युलन्स उभी राहत असून वडफळी व परिसरात सेवा देते.