जयनगर येथे ६४ जणांनी दिले स्वॅब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:31 IST2021-04-01T04:31:01+5:302021-04-01T04:31:01+5:30

जयनगर, ता.शहादा येथे पुन्हा कोरोनाने शिरकाव केला आहे. गेल्या १५ दिवसांपासून प्रत्येक घराघरात सर्दी-खोकला, ताप यांची लक्षणे दिसून येत ...

In Jayanagar, 64 people gave swabs | जयनगर येथे ६४ जणांनी दिले स्वॅब

जयनगर येथे ६४ जणांनी दिले स्वॅब

जयनगर, ता.शहादा येथे पुन्हा कोरोनाने शिरकाव केला आहे. गेल्या १५ दिवसांपासून प्रत्येक घराघरात सर्दी-खोकला, ताप यांची लक्षणे दिसून येत आहेत, तसेच अनेक रुग्णांमध्ये टाइफाइडची साथ दिसून येत आहे. मागील १५ दिवसांत ज्या घरात पेशंट आढळून आले होते. त्यांनी खासगी आणि नंदुरबार येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करीत शहादा व नंदुरबार येथील कोविड सेंटरला जाऊन उपचार करून घेतले.

जयनगरसह परिसरातील गावांमध्ये पेशंटची संख्या वाढू लागल्याने, येथील ग्रामपंचायत प्रशासनाने आरोग्य विभागाशी संपर्क साधत, गावातच आरोग्य पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्यानुसार, जयनगर येथील भक्त निवास येथे जयनगर, वडाळी व निंभोरे येथील एकूण ६४ जणांनी आपले स्वॅब तपासणीसाठी दिले आहेत. यावेळी आरोग्य पथकातील डॉ.जगदीश पाटील, डॉ.विजय पाटील, लॅब टेक्निशियन वाय.जी. पाटील, ए.एल. कुवर, आरोग्यसेविका एस.बी. इंगळे, आशासेविका ज्योती पाटील उपस्थित होते.

Web Title: In Jayanagar, 64 people gave swabs