जन शिक्षण संस्थानतर्फे महिला आरोग्यावर जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:19 IST2021-07-22T04:19:57+5:302021-07-22T04:19:57+5:30

यावेळी प्रमुख पाहुणे तलावीपाड्याच्या सरपंच प्रवीणा वळवी या होत्या. यावेळी आरोग्यसेविका मंगला वळवी यांनी मार्गदर्शन केले. मंगला ...

Jan Shikshan Sansthan raises awareness on women's health | जन शिक्षण संस्थानतर्फे महिला आरोग्यावर जनजागृती

जन शिक्षण संस्थानतर्फे महिला आरोग्यावर जनजागृती

यावेळी प्रमुख पाहुणे तलावीपाड्याच्या सरपंच प्रवीणा वळवी या होत्या. यावेळी आरोग्यसेविका मंगला वळवी यांनी मार्गदर्शन केले. मंगला वळवी यांनी महिलांनी मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी पॅडचा वापर केल्यास शरीरात कोणत्याही प्रकारचे जंतूचे संसर्ग होण्यापासून आपला बचाव होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. वयात आलेल्या मुलींनी काय काळजी घ्यावी. संतती प्रतिबंधावर असणाऱ्या प्रसाधनाच्या वापरावर मार्गदर्शन करून, मुलांच्या या वयात अंतर ठेवून कुपोषणावर कशी मात करावी, गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यावी, त्यांचा आहार, स्वच्छतेबाबत तसेच स्तनदा मातांनी बाळाचे स्तनपान, कुपोषित बालकाचे आरोग्य, आहार, काळजी तसेच शासकीय योजनांविषयी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रम अधिकारी शामकुमार चौधरी यांनी प्रास्ताविक केले. शेवटी उपस्थित महिलांना स्वच्छतेबाबत शपथ दिली. आभार प्रदर्शन शिलाबाई गावीत यांनी केले.

Web Title: Jan Shikshan Sansthan raises awareness on women's health