नंदुरबार शहरातील रोटरी वेलनेस सेंटरमध्ये रेमडीसीवर इंजेक्शन ५५० रुपयात उपलब्ध : चंद्रकांत रघुवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:30 IST2021-04-08T04:30:33+5:302021-04-08T04:30:33+5:30

शहर व ग्रामीण भागातल्या रुग्णांसाठी रेमडीसीवर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी रोटरी वेलनेस सेंटरच्या माध्यमातून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी ...

Injections available at Rs 550 at RDC Rotary Wellness Center in Nandurbar: Chandrakant Raghuvanshi | नंदुरबार शहरातील रोटरी वेलनेस सेंटरमध्ये रेमडीसीवर इंजेक्शन ५५० रुपयात उपलब्ध : चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार शहरातील रोटरी वेलनेस सेंटरमध्ये रेमडीसीवर इंजेक्शन ५५० रुपयात उपलब्ध : चंद्रकांत रघुवंशी

शहर व ग्रामीण भागातल्या रुग्णांसाठी रेमडीसीवर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी रोटरी वेलनेस सेंटरच्या माध्यमातून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली व त्याचा पाठपुरावा केला जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी एक हजार रेमडीसीवर इंजेक्शन नंदुरबार शहरातल्या सर्व हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या रुग्णांना देण्यासाठी रोटरी वेलनेस सेंटरला उपलब्ध करून दिलेले आहेत. ५५० रुपयांमध्ये अल्प दरात रुग्णांना रोटरी सेंटरच्या माध्यमातून इंजेक्शन पुरविण्यात येतील. शासनाने मान्यता दिलेल्या हॉस्पिटलमधील पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना देण्यात येतील .

या मागणीचे पत्र जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये यांना देण्यात आले. यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, राम रघुवंशी, विनयभाई श्रॉफ, सुनील चौधरी उपस्थित होते. त्यासंदर्भात त्यांनी तात्काळ इंजेक्शनचा पुरवठा केला व रोटरी सेंटरला एक हजार इंजेक्शन सुपूर्द केले.

Web Title: Injections available at Rs 550 at RDC Rotary Wellness Center in Nandurbar: Chandrakant Raghuvanshi