शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यातील आदिवासींच्या निसर्ग देवता पूजनाला आरंभ़; वाघदेव, बाबदेव, निलपी, आयखेडा यांची होतेय पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:32 IST

गावातील सर्वांचे आरोग्य निरोगी राहावे, अन्न धान्याची बरकत राहावी, जंगली जनावरांपासून गाई – गुरे, शेळ्या यांचे संरक्षण व्हावे, ...

गावातील सर्वांचे आरोग्य निरोगी राहावे, अन्न धान्याची बरकत राहावी, जंगली जनावरांपासून गाई – गुरे, शेळ्या यांचे संरक्षण व्हावे, गावात सुख-समृद्धी नांदावी, यासाठी आदिवासी या निसर्ग देवतांची पूजा करीत असतो. जुलै महिन्यात वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या दिवशी यांचे पूजन करण्यात येते. गावातील वाघदेव पूजनासाठी सर्व प्रथम पोलीस पाटील मार्फत गावकऱ्यांची बैठक बोलवण्यात येते. या बैठकीत पूजनासाठी येणाऱ्या खर्चाचा आराखडा सर्वानुमते ठरविण्यात येतो आणि पूजनाचा कार्यक्रम कधी घ्यायचा, त्याचा दिवस सामूहिकरीत्या ठरविण्यात येतो. तत्पूर्वी येणाऱ्या खर्चाच्या आराखड्यानुसार प्रत्येक कुटुंबाला किती वर्गणी येईल, याचा हिशेब लावून वर्गणी जमा करण्यासाठी किमान आठवडाभराचा अवधी देण्यात येतो.

ठरलेल्या कालावधीत पूजन साहित्य खरेदीसाठी बाजारात जाऊन साहित्य खरेदी करतात. तत्पूर्वी गावातील पोलीस पाटील, करवाण्या, कारभारी, डाया यांना तीन किंवा पाच दिवस पथ्थ्य पाळावे लागते. याला पालनी असे म्हटले जाते.

निसर्ग देवतेच्या पूजनाच्या दिवशी सर्व गावकरी सकाळी पोलीस पाटील यांच्या घरी गोळा होतात. गावदेवतेची पूजा करणारा पुजारी आल्यानंतर आधी पोलीस पाटील यांच्या घरी पूजा होते. तद्‌नंतर गावाच्या विशिष्ठ ठिकाणी विशेषत: टेकडीवर स्थापन केलेल्या गावदेवतेच्या पुजनासाठी संपूर्ण गाव रवाना होते. गावदेवतेच्या पूजनासाठी प्रत्येक कुटुंबातून तीन ते चार मूठभर ज्वारीचे धान्य घेऊन जावे लागते. त्याला आदिवासी भाषेत निहवारा असे म्हटले जाते. आणलेले ज्वारीचे धान्य एकत्र गोळा करून त्या धान्याने निसर्ग देवताची पूजा केली जाते. यावेळी गावाचे आरोग्य, संरक्षण, सुख समृद्धी, जनावरांचे रक्षण यासाठी निसर्ग देवतेकडे साकळे घातले जाते. शिवाय जंगलातील नवीन आलेल्या फुलापानांचा व भाज्यांचा वापर करण्यासाठी परवानगीही मागण्यात येते. ही पूजा केल्यानंतर आदिवासी बांधव रानावनात नवीन आलेल्या फुलापानांचा व भाज्यांचा कधीच वापर करीत नाहीत.

निसर्ग देवतेच्या पूजनाच्या वेळेस गावाची एकता आणि अखंडता नरजेस भरण्यासारखी असते. मनात पूजनाची शुद्ध भावना असल्यामुळे प्रत्येक गावकरी पूजनासाठीचे छोटे मोठे काम अतिशय आनंदाने आणि आपल्या घरचे काम असल्यासारखे करतो. अशा प्रकारे निसर्ग देवताचे सामूहिक पूजनाच्या सातपुडा पट्ट्यात सुरुवात झाली असून, सर्वत्र आनंदीमय वातावरण निर्माण झाले आहे. आठवड्याभरात हरणखुरी, रोषमाळ बु., मनवाणी, उमराणी बु. या ठिकाणी पूजनाचा कार्यक्रम पार पडला आहे.

शुक्रवारी चोंदवाडे खुर्द येथे झालेल्या पुजनाच्यावेळी पोलीस पाटील भरत पावरा, विजय पावरा, करवाण्या गरदन पावरा, कारभारी फोपा पावरा, डाया तमाशा पावरा आपसा पुजारा, के. के. पावरा यांच्यासह सर्वत्र ग्रामस्थ उपस्थित होते.