शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातील प्राणवायू ठरणार भारतीय जैन संघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऑक्सिजन नगरी म्हणून ओळख ठरू पाहणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागात सोईसुविधांच्या अभावामुळे ऑक्सिजन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : ऑक्सिजन नगरी म्हणून ओळख ठरू पाहणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागात सोईसुविधांच्या अभावामुळे ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी येणारी समस्या सोडविण्यासाठी भारतीय जैन संघाने पुढाकार घेतला आहे. या संघातर्फे २५० ऑक्सिजनचे जम्बो सिलिंडर जिल्ह्याला देण्यात येत असून, ते दुर्गम भागातील प्राणवायू ठरणार आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या वर्षापर्यंत एकही ऑक्सिजन प्रकल्प नव्हता. कोरोनाचा संसर्ग उद्‌भवल्यानंतर ऑक्सिजनची समस्या प्रकर्षाने जाणवू लागली. यापूर्वी धुळे, जळगाव, नाशिक, सुरत येथून ऑक्सिजन सिलिंडर येत होते. त्यामुळे ऐन वेळी गरज पडल्यास १०० ते २०० किलोमीटरवरून ऑक्सिजन सिलिंडर आणण्यात विलंब झाल्यास रुग्णांसाठी अडचण ठरू शकते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये यांनी पुढाकार घेऊन हवेतील ऑक्सिजन प्रकल्प उभा केला आहे. त्याचा विस्तारही केला, असे प्रकल्प शहादा, तळोदा आणि नवापूर येथेही सुरू करण्याची तयारी सुरू झाली. त्यामुळे ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होण्याची जिल्हा तयारी करीत असताना, दुर्गम, अतिदुर्गम भागातील प्रश्न मात्र प्रशासनापुढे चिंताजनक होता. धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील रुग्णांसाठी किमान प्राथमिक स्तरावर ऑक्सिजन पुरवठा करता यावा, यासाठी प्रशासनाचे नियोजन सुरू होते आणि तो चिंताजनक प्रश्नही ठरला होता.

या पार्श्वभूमीवर भारतीय जैन संघाने पुढाकार घेऊन आणि जिल्हा प्रशासनाच्या कार्याचे काैतुक करीत प्रशासनाला मदतीचा हात दिला. याबाबत मुंबईचे प्रसिद्ध उद्योगपती मोतिलाल ओसवाल यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्याशी संपर्क साधून त्यांनी मदतीची इच्छा व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना जिल्ह्यासाठी नेमकी काय गरज आहे, त्याबाबतची भूमिका मांडली. त्यातून त्यांनी ऑक्सिजन जम्बो सिलिंडर देण्याची तयारी दर्शविली.

जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर, मोतिलाल ओसवाल यांनी भारतीय जैन संघाला एक कोटी रुपयांची देणगी देऊन, त्यातून हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, २५० ऑक्सिजन जम्बो सिलिंडर जिल्ह्याला मिळणार असून, त्यातील १०० सिलिंडर घेऊन बुधवारीच वाहन नंदुरबारकडे रवाना झाले आहे. गुरुवारी सकाळी हे सिलिंडर जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात देण्यात येणार आहे.