शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रुग्णालयात खाटा वाढल्याने मातांची झाली सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:43 IST

सोयी सुविधा वाढल्याने दर दिवशी जिल्हा रुग्णालयात ५० च्या जवळपास मातांना दाखल करून त्यांची प्रसूती करण्यात येत आहे. सिझर ...

सोयी सुविधा वाढल्याने दर दिवशी जिल्हा रुग्णालयात ५० च्या जवळपास मातांना दाखल करून त्यांची प्रसूती करण्यात येत आहे. सिझर आणि नाॅर्मल पद्धतीने होणाऱ्या या प्रसूतीसोबतच नवजात अर्भकांसाठी शीतपेट्या व आयसीयू तयार करण्यात आल्या असल्याने दरदिवशी येथे प्रसूतीसाठी येणाऱ्या मातांची संख्या वाढती आहे. यामुळे प्रशासनाकडून तीन वेगवेगळे वाॅर्ड तयार करून मातांची सोय करण्यात आली आहे. या वाॅर्डांमध्ये तपासणी केली असता, स्वच्छता आणि टापटीप दिसून आली. मातांना बाळांना स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र कक्षही तयार करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयातील तीनही वाॅर्डमध्ये भंडारा येथील दुर्दैवी घटनेनंतर दक्षता घेतली जात असल्याचे दिसून आले. कक्षातच तीन परिचारिका ह्या कायम नियुक्त तर त्यापेक्षा अधिक परिचारिका ह्या तपासणीसाठी सज्ज असल्याचे दिसून आले. वेळोवेळी याठिकाणी वैद्यकीय अधिकारी, स्त्री रोग तज्ञ व बालरोग तज्ञ हे भेटी देत असल्याचे सांगण्यात आले.

याठिकाणी दाखल असलेल्या नाॅर्मल डिलिव्हरीतील वाॅर्डात देण्यात आलेल्या चादरी गाद्यांबाबत काहीशी नाराजी व्यक्त करण्यात आली. रुग्णालयातील प्रसूती कक्षात सर्वप्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. या सुविधांमुळे याठिकाणी रात्री-अपरात्री मातेला दाखल केल्यास वेळेवर प्रसूती व्हावी यासाठी आठ टेबल तयार करण्यात आले आहेत. याठिकाणी मातांना योग्य पद्धतीने सुविधा दिल्या जात आहेत. व्हीलचेअर, स्ट्रेचर याबाबत मात्र अद्यापही योग्य ती कार्यवाही झालेली नाही.

दुर्गम भागातून याठिकाणी आणले गेल्यानंतर काही वेळात माझ्या मुलीने बाळाला जन्म दिला. सर्व सोयी असल्याने अडचणी आल्या नाहीत. सर्व प्रकारे सोयी दिल्या. डाॅक्टरांनी मार्गदर्शन केले.

-कमलबाई वळवी, डिस्चार्ज दिलेल्या मातेच्या आई

जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर भीती होती. प्रथम बाळंतपण असल्याने अनेक बाबींचे मार्गदर्शन नव्हते. येथे आल्यानंतर माहिती दिली गेली. बेडही उपलब्ध करून देण्यात आला.

-प्रसूती झालेली माता,

सद्या उपचारार्थ दाखल,

डाॅक्टरांचा होतोय वेळेवर राऊंड

जिल्हा रुग्णालयात तीन स्त्री रोग तज्ञ सध्या काम करत आहेत. त्यांच्याकडून प्रसूतीसाठी मातांच्या तीनही वाॅर्डमध्ये सातत्याने भेटी दिल्या जातात.

सिझर शस्त्रक्रिया असल्यास तशी कल्पना मातेच्या कुटुंबाला दिली जाते. यातून मग सिझर झाल्यानंतर मातेची वेळोवेळी पाच दिवस तपासणी केली जाते.

डिस्चार्ज देण्यासह इतर मार्गदर्शन करण्यासाठी महिला वैद्यकीय अधिकारी मदत करत असल्याचे दिसून आले. मातेसोबत आलेल्या महिला व पुरुषांना वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्याकडूनही मदत करण्यात येत असल्याचे यावेळी दिसून आले.