घनकचऱ्यातून खत निर्मिती करणाऱ्या यंत्राचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 12:50 PM2020-10-28T12:50:55+5:302020-10-28T12:51:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : घनकचऱ्याचे विलगी करण करून त्यापासून खत तयार करण्यासाठी नवापूर पालिकेने ३२ लाख रूपये खर्चून ...

Inauguration of solid waste composting plant | घनकचऱ्यातून खत निर्मिती करणाऱ्या यंत्राचे उद्‌घाटन

घनकचऱ्यातून खत निर्मिती करणाऱ्या यंत्राचे उद्‌घाटन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : घनकचऱ्याचे विलगी करण करून त्यापासून खत तयार करण्यासाठी नवापूर पालिकेने ३२ लाख रूपये खर्चून कार्यान्वित केलेल्या क्रिनींग मशिन व सिंगल शॉप मशिनचे आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.  
नवापूर नगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत राज्य शासनाकडून घनकचऱ्याचे विलगीकरण करण्यासाठी डीपीआर अंतर्गत ओला व सुका कचऱ्याची मळणी करून खत तयार करण्यासाठी क्रिनींग मशिन व सिंगल शॉप मशिन खरेदी केले आहे. पालिकेस यासाठी ३२ लाख रूपये मंजुर करण्यात आले होते. ही दोन्ही यंत्रे खरेदी करून ते कार्यन्वित करण्यात येऊन त्यांचे लोकार्पण आमदार शिरीष नाईक व नगराध्यक्षा हेमलता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पालिका प्रशासन लोकहितासाठी विविध योजना व त्या अंतर्गत सुविधा पुरविण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. चांगल्या कार्यासाठी आपण नेहमी साथ दिली असून, लोकहिताची सर्व कामे करण्यासाठी या पुढेही सहकार्य करू असे आमदार शिरीष नाईक यांनी सांगितले. 
याप्रसंगी उपनगराध्यक्ष आरीफ बलेसरीया, गटनेता आशिष मावची, विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, नगरसेवक खलील खाटीक, नगरसेविका बबीता वसावे, माजी नगरसेवक अजय पाटील, सुभाष कुंभार, फारूक शहा, मुख्याधिकारी तृप्ती धोडमीसे, प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार, मिलिंद भामरे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार तर आभार आरोग्य निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमासाठी हरीन अटालीया, विजय सामुद्रे, मिलिंद पाटील, अशोक ढंडोरे व अजय तांबोळी यांनी परीश्रम घेतले. 

 

जी.एम. पोर्टलव्दारे ३२ लाखाचे मशिन २७ लाखात खरेदी करण्यात आले आहे. सेंडर मशिनमध्ये ओला कचरा मळणी करण्यात येईल व क्रिनींग मशिनमध्ये घरगुती कचरा टाकून प्लास्टिक, रबर व इतर कचरा वेगळा करून त्यांचीही मळणी करता येऊ शकते. दोन्ही मशिनमध्ये मळणी झालेल्या कचऱ्याची योग्य प्रक्रिया करून खत निर्मिती केली जाईल. 
    - राजेंद्र चव्हाण, आरोग्य निरीक्षक

Web Title: Inauguration of solid waste composting plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.