शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित आढळणाऱ्या गावात तातडीने विलगीकरण कक्ष सुरू करा- डॉ. राजेंद्र भारुड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:29 IST

दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, ...

दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, रॅपीड अँन्टीजेन टीमच्या सदस्यांची बैठक घ्यावी आणि कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना विलगीकरण कक्षात पाठविण्याची व्यवस्था करावी. गटविकास अधिकारी यांनी गावातील समाजमंदिर, शाळा, सभागृहात विलगीकरण कक्ष सुरू करण्यासाठी उपाययोजना करावी. ग्रामपंचायतीमार्फत कोरोना बाधितांसाठी जेवणाची व्यवस्था करावी. महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. आशा कार्यकर्तीमार्फत ऑक्सिजन तपासणी करावी. शाळेच्या मुख्याध्यापकांनी विलगीकरण कक्षाचे प्रमुख म्हणून काम पहावे.

बाधित व्यक्तीला १० दिवस विलगीकरण कक्षात ठेवावे. पुढील महिनाभरात बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता कोरोनाबाधित व्यक्ती कुटुंबासोबत राहणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे.

बाधित व्यक्तीची ऑक्सिजन पातळी खालावल्यास जवळच्या कोविड रुग्णालयात संदर्भित करण्यात यावे. अधिक कोरोनाबाधित आढळणाऱ्या गावांत उपघटना व्यवस्थापकाची नियुक्ती करावी. या अधिकाऱ्याने विलगीकरण कक्ष आणि तेथील व्यवस्थेचा दैनंदिन आढावा घ्यावा. आशा सेविकांमार्फत संपर्क साखळी शोधण्याचा प्रयत्न करावा. नियोजनबद्ध पद्धतीने ही सर्व कार्यवाही करावी. गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांनी अधिकाधिक विलगीकरण कक्ष सुरू करण्यावर भर द्यावा. विलगीकरण कक्षातील स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे. नव्याने येणाऱ्या रुग्णवाहिकांचा उपयोग केवळ कोरोनाबाधित रुग्णांसाठीच करावा. ग्रामपंचायत पातळीवर जनजागृतीवर भर देण्यात यावा. जनता कर्फ्यूच्या कालावधीत बाजार भरणाऱ्या गावात निर्जंतुकीकरणाचे काम करावे. गर्दीच्या ठिकाणी भाजीच्या गाड्या उभ्या राहणार नाहीत. त्याऐवजी मोकळ्या पटांगणात उभ्या राहतील याची दक्षता घ्यावी.

घटना व्यवस्थापकांनी नव्या क्षेत्रात कोरोनाबाधित आढळल्यास त्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करा, बँकेच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे, बँकेत गर्दी होणार नाही याबाबत नियोजन करण्यात यावे, सरकारी कार्यालयातील अभ्यागतांना परवानगी देऊ नये, ऑक्सिजन पातळी खालावलेल्या रुग्णांनाच रेमडिसीवीर औषध देण्यात यावे, रुग्णालयाची रेमडिसीवीरबाबत मागणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडे मागणी घ्यावी आणि त्यानुसार थेट रुग्णालयांना औषध पुरविण्यात यावे, दररोज पाच हजार व्यक्तींचे लसीकरण करण्याबाबत नियोजन करण्यात यावे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने तालुका स्तरावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

बैठकीस तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.