ग्रामीण भागातून अवैध प्रवासी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:48 IST2021-02-23T04:48:07+5:302021-02-23T04:48:07+5:30

नंदुरबार : तालुक्यातील ग्रामीण भागातून विविध कामांसाठी शहरात नागरिक सकाळी दाखल होतात. मात्र, शहरात येण्यासाठी पुरेशी बससेवा ...

Illegal passenger transport from rural areas | ग्रामीण भागातून अवैध प्रवासी वाहतूक

ग्रामीण भागातून अवैध प्रवासी वाहतूक

नंदुरबार : तालुक्यातील ग्रामीण भागातून विविध कामांसाठी शहरात नागरिक सकाळी दाखल होतात. मात्र, शहरात येण्यासाठी पुरेशी बससेवा नसल्याने नागरिक खासगी वाहनात जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. खासगी वाहनामध्ये अवैध प्रवासी वाहतूक करण्यात येत असून, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. अवैध वाहतूक करणाऱ्यावर वाहतूक पोलिसांनी कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.

चिकन विक्री व्यवसाय मंदावला

नंदुरबार : जिल्ह्यातील चिकन विक्री व्यवसाय काही प्रमाणात मंदावला असल्याचे दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात पक्ष्यांवर बर्ड फ्लू आजार आतापर्यंत दिसून आलेला नाही; मात्र राज्यभरात पक्ष्यावर बर्ड फ्लू आजाराचे सावट असल्याने त्यांचे परिणाम नंदुरबार जिल्ह्यातील चिकन विक्री व्यवसायावर दिसून येत असल्याने चिकन विक्रेते चिंतेत दिसून येत आहे.

Web Title: Illegal passenger transport from rural areas