नंदवलवड येथे गुरांच्या गोठ्यात सापडले अवैध मद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:14 IST2020-05-27T12:14:27+5:302020-05-27T12:14:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदलवड ता़ धडगाव येथील एकाच्या घराजवळ असलेल्या पशुंच्या गोठ्यातून पोलीसांना तब्बल ४० हजार रुपयांच्या ...

 Illegal liquor found in cattle shed at Nandwalwad | नंदवलवड येथे गुरांच्या गोठ्यात सापडले अवैध मद्य

नंदवलवड येथे गुरांच्या गोठ्यात सापडले अवैध मद्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदलवड ता़ धडगाव येथील एकाच्या घराजवळ असलेल्या पशुंच्या गोठ्यातून पोलीसांना तब्बल ४० हजार रुपयांच्या देशी विदेशी मद्याच्या बाटल्या मिळून आल्या आहेत़ धडगाव पोलीसांनी सोमवारी रात्री नंदवलड येथे छापा टाकल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़
करमसिंग जोब्या वळवी ऱा नंदलवड असे मद्यविक्री करणाऱ्या संशयिताचे नाव असून त्याने घराशेजारी असलेल्या गुरांच्या गोठ्यात दारुचा साठा केल्याची माहिती धडगाव पोलीसांना मिळाली होती़ माहितीनुसार पोलीसांनी सोमवारी रात्री नंदलवड येथे छापा टाकला असता येथून ४० हजार ८०० रुपयांच्या ४०८ देशी विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या़ दरम्यान संशयित करमसिंग हा घटनास्थळावरुन पळून गेला़
याबाबत पोलीस नाईक विलास अजगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन करमसिंग वळवी याच्याविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक काझी करत आहेत़

Web Title:  Illegal liquor found in cattle shed at Nandwalwad