वावडीफाटय़ाजवळ अवैध दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 02:36 PM2019-11-17T14:36:22+5:302019-11-17T14:36:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : गुप्त माहितीच्या आधारे नवापूर पोलिसांनी पिंपळनेर   रस्त्यावर गुजरातकडे विना परवाना देशी-विदेशी दारु वाहून नेणारी  ...

Illegal ammunition seized near Vavadifatya | वावडीफाटय़ाजवळ अवैध दारूसाठा जप्त

वावडीफाटय़ाजवळ अवैध दारूसाठा जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : गुप्त माहितीच्या आधारे नवापूर पोलिसांनी पिंपळनेर   रस्त्यावर गुजरातकडे विना परवाना देशी-विदेशी दारु वाहून नेणारी  कार व मुद्देमाल जप्त करुन सुबीर येथील एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रानुसार, एका चारचाकी वाहनातून पिंपळनेरकडील जाणा:या रस्त्यावरुन  गुजराथकडे अवैधरित्या विदेशी दारुची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती नवापूरचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक  डी.एस. शिंपी, सहायक पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पवार, हे.कॉ. गुमानसिंग पाडवी, प्रविण मोरे यांनी नवापूर ते पिंपळनेर रस्त्यावर वावडी फाटा येथे सापळा लावून संशयीत वाहनास (क्रमांक जीजी- 19 ए-2161) इशारा करुन थांबवले. वाहनाची पंचांसमक्ष तपासणी केली असता त्यात विनापरवाना दारु असल्याच्या माहितीची खात्री  झाली.  वाहनास पोलीस ठाण्यात आणून पंचांसमक्ष वाहनातून मुद्देमाल खाली उतरवून मोजणी केली असता विदेशी दारू, बियरच्या बाटल्या व  देशी दारुच्या प्लास्टीकच्या व काचेच्या बाटल्या अशी 50 हजार 184 रुपये किमतीचा देशी-विदेशी दारुसाठा आढळून आला.  वाहनाची किंमत 30 हजार मिळून एकूण 80  हजार 184 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  याप्रकरणी संशयित आरोपी  मनश्या बैजू महात्रे (36, रा.दहेल, ता.सुबीर, जि.डांग) याला ताब्यात घेण्यात आले आहे. नवापूर पोलीस नेहमी सतर्क राहत असल्याने यापूर्वीही लोकसभा निवडणुकीच्या काळात अवैध दारुची मोठी कारवाई करण्यात आली होती. जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्या कार्यकाळात अशा अनेक कारवाई करण्यात पोलिसांना यश आले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली   पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक डी.एस. शिंपी, कृष्णा पवार, गुमानसिंग पाडवी, प्रविण मोरे यांनी ही कारवाई केली असून याबाबत दाखल गुन्ह्याचा तपास कृष्णा पवार करीत आहेत.
 

Web Title: Illegal ammunition seized near Vavadifatya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.