शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कामे झाली नाही तर आता जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 1:19 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : नंदुरबार-धुळे जिल्ह्यात तापी नदीवरील उपसा सिंचन योजनांची दुरुस्ती करून कार्यान्वित करण्याचे काम ३१ जानेवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : नंदुरबार-धुळे जिल्ह्यात तापी नदीवरील उपसा सिंचन योजनांची दुरुस्ती करून कार्यान्वित करण्याचे काम ३१ जानेवारी २०२१ पर्यंत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येऊन उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाऊल जलसंपदा विभागामार्फत घेण्यात येईल, असे आश्वासन नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथकाचे अधीक्षक अभियंता धुळे एम.एस. आमले यांनी दिल्यानंतर लाभधारक शेतकऱ्यांनी २१ ऑक्टोबरचे उपोषण स्थगित केले आहे. ३१ जानेवारी २०२१ पर्यंत योजना कार्यान्वित न झाल्यास तापी नदीत जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.तापी नदीवरील २२ उपसा सिंचन योजनांचे काम गेल्या तीन-चार वर्षापासून सुरू आहे. अद्याप एकाही योजनेचे काम पूर्णत्वास न आल्यास उपसा सिंचन योजनेचे लाभधारक सभासद हवालदिल झाले आहेत. सुरुवातीचे दुरुस्ती कामासाठी ४२ कोटी रुपयांची मंजुरी असून आता सुधारित दुरुस्ती अंदाजपत्रक ११५ कोटीचे असून सुप्रमाकरीता कामे प्रलंबित आहे व त्यामुळे दुरुस्तीचे कामे थांबली आहेत. उपसा सिंचन योजना लवकर कार्यान्वित होण्यासाठी २१ ऑक्टोबरपासून उपोषण करण्याचे ठरविले होते. या पार्श्वभूमीवर उपसा सिंचन योजनांचे लाभधारक शेतकरी व नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथकाचे अधीक्षक अभियंता यांच्यात २० ऑक्टोबर रोजी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी कामास गती देऊन उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी नंदुरबार येथील कार्यालयात त्याबाबत बैठक होऊन त्यात ही कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती मंजुरी ३१जानेवारी २०२१ पर्यंत घेऊन मधल्या काळात कामे पूर्ण करावीत, असे सर्वानुमते ठरले. या चर्चेत लाभधारक शेतकऱ्यांनी या योजना कार्यान्वित होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. यावर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा करून शेतकऱ्यांचे सर्व म्हणणे ऐकून घेत सदर योजना ३१जानेवारी २०२१ पर्यंत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे आश्वासन दिले. यावर समाधान व्यक्त करीत लाभधारक शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासित केल्याने उपसा सिंचन योजनांच्या पदाधिकाऱ्यांनी २१ऑक्टोबर २०२० रोजीचे आमरण उपोषण स्थगित करुन ३१ जानेवारी २०२१पर्यंत योग्य ती कार्यवाही न झाल्यास १ फेब्रुवारी २०२१ रोजी २२ उपासा सिंचन योजनांचे पदाधिकारी व लाभधारक शेतकरी तापी नदीपात्रात जलसमाधी घेतील, असा निर्णय २२ उपसा सिंचन योजनांचे चेअरमन व पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते घेतला आहे.२० ऑक्टोबर रोजी नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथकाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर, नंदुरबार व धुळे जिल्हा पाणीपुरवठा संघाचे उपाध्यक्ष जिजाबराव गोरख पाटील (धमाणे), मुकेश चौधरी (लहान शहादे), विनोद पाटील (पुसनद), रितेश बोरसे (कळंबू) यांच्यासह उपसा सिंचन योजनांचे पदाधिकारी व लाभधारक शेतकरी उपस्थित होते. या       बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात येऊन दोन्ही बाजूने निर्णय घेण्यात आला.